दिंडोरी, पुढारी वृत्‍तसेवा : नाशिक-वणी रस्त्यावर वणी येथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकाच्या कारने वनारवाडी फाट्यावर अचानक पेट घेतवा. यामध्ये संपूर्ण कार आगीच्या भक्षस्थानी येऊन जळून खाक झाली.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, योगेश प्रकाश गिरासे (रा. शिरपूर जि.धुळे) हल्ली मुक्काम सिडको नाशिक हे आपल्या कुटुंबीयांसोबत कार (क्रमांक एम एच 15 सि टी 6333) नाशिक कडून वनी येथे जात असताना वनारवाडी फाट्याच्या अलीकडे त्यांच्या कारमधून अचानक धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला घेतली व कार मधील चार जण कारमधून बाहेर पडले. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रोद्ररूप धारण केल्याने संपूर्ण कार जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने कारमधील प्रवासी वेळेवर खाली उतरल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही.

हेही  वाचा  

  • दोन्ही संघटनांच्या खेळाडूंमध्ये निवड चाचणी होणार का?
  • बेळगाव : भगवे ध्वज लावलेल्या वाहनांची अडवणूक
  • सांगली : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी २० कुस्तीगिरांची निवड