नवीन वर्षात नेटफ्लिक्सचा युजर्सला झटका! पासवर्ड शेअर करता येणार नाही

- मुख्यपृष्ठ
- करमणूक
- Netflix Password Sharing: नवीन वर्षात नेटफ्लिक्सचा युजर्सला झटका! पासवर्ड शेअर करता येणार नाही, जाणून घ्या काय आहे कारण
Netflix Password Sharing: नवीन वर्षात नेटफ्लिक्सचा युजर्सला झटका! पासवर्ड शेअर करता येणार नाही, जाणून घ्या काय आहे कारण
Netflix Password Sharing: जर तुम्ही दुसरं कोणाचं तरी नेटफ्लिक्स वापरत असाल किंवा तुमचा पासवर्ड तुमच्या मित्रांसोबत शेअर करत असाल तर, तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंगबाबत कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे.
By: एबीपी ब्युरो | Updated at : 25 Dec 2022 07:46 PM (IST)
Edited By: सतिश केंगार
Netflix to end password sharing in 2023
Netflix Password Sharing: जर तुम्ही दुसरं कोणाचं तरी नेटफ्लिक्स (Netflix) वापरत असाल किंवा तुमचा पासवर्ड तुमच्या मित्रांसोबत शेअर करत असाल तर, तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंगबाबत कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. एका रिपोर्टनुसार, पुढील वर्षापासून (New Year 2023) नेटफ्लिक्स (Netflix) आपल्या युजर्सला घराबाहेरील लोकांसोबत पासवर्ड शेअर करण्याची परवानगी देणार नाही. याबाबतच सविस्तर माहिती जाणून घेऊ…
Netflix Password Sharing: आता पासवर्ड शेअर करता येणार नाही
‘द वॉल स्ट्रीट जर्नल’मधील (The Wall Street Journal) वृत्तानुसार, 2023 च्या सुरुवातीपासून नेटफ्लिक्स युजर्स त्यांच्या अकाउंटचा पासवर्ड मित्र किंवा त्यांच्या घराबाहेरील कोणाशीही शेअर (Netflix to end password sharing in 2023) करू शकणार नाहीत. याशिवाय तुम्ही तुमचा Netflix पासवर्ड तुमच्या घराबाहेरील कोणाशी शेअर केल्यास, त्या व्यक्तीला Netflix मध्ये प्रवेश करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. पैसे न भरता, कोणीही त्यांच्या मित्राच्या Netflix प्रोफाइलमध्ये प्रवेश करू शकणार नाही. नेटफ्लिक्स अनेक महिन्यांपासून पासवर्ड शेअरिंग संपवण्याचे मार्ग शोधत (Netflix to end password sharing in 2023) आहे. आता नेटफ्लिक्सने याबाबत कठोर पावले उचलली आहेत. वॉशिंग्टन जर्नलने देखील याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. वॉशिंग्टन जर्नलच्या वृत्तानुसार, नेटफ्लिक्स पुढील वर्षी यूजर्सना पासवर्ड शेअर करण्यावर बंदी घालणार आहे. कंपनी हे नियम अचानक लागू करण्याऐवजी कंपनी हळूहळू किंवा टप्प्याटप्प्याने लागू करू शकते, असे बोलले जात आहे.
Netflix to end password sharing in 2023: पासवर्ड शेअरिंग बंद करण्याचे काय आहे कारण?
नेटफ्लिक्सने (Netflix) सबस्क्रिप्शन प्लॅन लॉन्च केल्यापासून पासवर्ड शेअरिंग ही एक मोठी समस्या बनली आहे. परंतु कंपनीने तोटा होईपर्यंत युजर्सवर कोणतीही कारवाई केली नाही. या वर्षाच्या सुरुवातीला नेटफ्लिक्सचा महसूल कमी झाला आणि प्लॅटफॉर्मने 10 वर्षांत पहिल्यांदा आपले सबस्क्रायबर गमावले. यामुळेच कंपनीला पासवर्ड शेअरिंग बंद (Netflix to end password sharing in 2023) करण्याचा विचार करावा लागला, असं बोललं जात आहे. 2022 च्या सुरुवातीला, नेटफ्लिक्सचे (Netflix) सीईओ रीड हेस्टिंग्स म्हणाले होते की, कंपनी लवकरच पासवर्ड शेअरिंगवर बंदी घालेल.
इतर महत्वाच्या बातम्या:
News Reels
Upcoming 7-Seater Cars 2023: देशात नवीन वर्षात लॉन्च होणार जबरदस्त 5 आणि 7 सीटर कार, पाहा संपूर्ण लिस्ट
ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात