नववर्षाच्या स्वागताला पुणेकरांचा प्रवास सुखाचा होणार, डबल डेकर बस धावणार

नववर्षाच्या-स्वागताला-पुणेकरांचा-प्रवास-सुखाचा-होणार,-डबल-डेकर-बस-धावणार

Pune Bus Service : नववर्षाच्या स्वागताला पुणेकरांचा प्रवास सुखाचा होणार, डबल डेकर बस धावणार

पीएमपीएलच्या ताफ्यात पुढील वर्षी डबल डेकर बस आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत पीएमपीएलची नुकतीच एक बैठक पार पडली

पीएमपीएलच्या ताफ्यात पुढील वर्षी डबल डेकर बस आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत पीएमपीएलची नुकतीच एक बैठक पार पडली

पीएमपीएलच्या ताफ्यात पुढील वर्षी डबल डेकर बस आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत पीएमपीएलची नुकतीच एक बैठक पार पडली

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

पुणे, 29 डिसेंबर : पुण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये सध्या सिंगल बस धावत आहेत. दरम्यान पुढच्या काळात पुण्यात वाढणाऱ्या रहदारीचा विचार करता डबल डेकर बस आणण्याच्या तयारीत आहेत. पीएमपीएलच्या ताफ्यात पुढील वर्षी डबल डेकर बस आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत पीएमपीएलची नुकतीच एक बैठक पार पडली आणि त्यात पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांनी याबद्दल माहिती दिली.

बकोरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, “डबल डेकर बस पुण्यात सुरू करण्याबाबत प्राथमिक चर्चा झालेली आहे. मुंबईमध्ये डबल डेकर बस धावत आहेत याचे कारण म्हणजे तिथल्या पायाभूत सुविधा (infrastructure) पुण्यापेक्षा वेगळ्या आहेत.

हे ही वाचा : फोन टॅपिंग प्रकरणात मोठी अपडेट; न्यायालयाच्या नव्या आदेशाने रश्मी शुक्ला अडचणीत?

आम्ही मुंबई मधील बेस्ट शी यासंदर्भात चर्चा करणार आहोत. या बसेस पुण्यासह, पिंपरी चिंचवड मध्ये किती यशस्वी होतील यासाठी एक अहवाल तयार केला जाईल आणि त्यानंतर या बद्दल ठोस निर्णय घेतला जाईल, असे बकोरिया पुढे म्हणाले.

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Pune, Pune (City/Town/Village), Pune Muncipal corporation

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *