नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शरद पवार शेतकऱ्याच्या बांधावर

नववर्षाच्या-पहिल्याच-दिवशी-शरद-पवार-शेतकऱ्याच्या-बांधावर

इंदापूर, 01 जानेवारी : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शरद पवार पाहणी केली आणि संवाद साधलाा. यावेळी पवारांनी खासदाराबाबत गुगली टाकली आणि एकच हश्शा पिकली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. इंदापूर तालुक्यातील बोरी आणि कळस या गावांना पवार यांनी भेटी दिल्या. यावेळी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शरद पवार पाहणी केली. यावेळी शरद पवारांनी उपस्थितीताना मार्गदर्शन केले.

‘मी एका ठिकाणी विचारले की खासदार येतात का? तर ते म्हणाले सारखे येतात. आधीचे खासदार कधी येतंच नव्हते तेव्हा मी सांगितले की पूर्वीचा खासदार मीच होतो’ असे म्हणताच एकच हशा पिकला.

(उद्धवजींबद्दल आदरच पण जेव्हा घर पेटतं तेव्हा.., नेमकं काय म्हणाले दीपक केसरकर?)

‘महाराष्ट्रातील काही गाव अशी आहेत की त्याबद्दल जास्त आत्मयिता आहे. प्रतिकूल परिस्थितीत देखील येथील शेतकरी मात करतात. 15 वर्षांपूर्वी फळबाग लागवड संबंधित प्रचार हा राष्ट्रीय पातळीवर न्यावा अशी योजना मी आखली. आज जगात सर्वात जास्त फळ उत्पादन करणारा देश भारत आहे. अनेक देशात मी जातो तेव्हा बाजरात जातो तेव्हा त्या बाजारात भारताचा शिक्का मी बघतो, असं पवारांनी आवर्जुन सांगितलं.

(24 तासांच्या आत माफी मागा अन्यथा…, भाजपकडून अजित पवारांना अल्टिमेटम)

‘एकेकाळी 86 टक्के लोक शेती करायचे तो आकडा 60 टक्केवारी आली आहे. पूर्वी जास्त गाड्या नसल्याच्या आता परिस्थिती अशी झाली आहे की कुणाचं लग्न असले की पहिली पार्किंगची सोया करावी लागते. आज द्राक्षे परदेशात जात आहेत. महिंद्रा आणि माझे वेगळे संबंध आहेत. सुप्रिया सुळे यांचे सासरे आणि केशव महिंद्रा हे एकावेळी सोबत शिकायला होते, असंही यावेळी पवारांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *