नवरीला घेऊन हनिमूनवर, अडकला सेक्स वर्करच्या जाळ्यात; आयुष्यभराची अद्दल घडली!

नवरीला-घेऊन-हनिमूनवर,-अडकला-सेक्स-वर्करच्या-जाळ्यात;-आयुष्यभराची-अद्दल-घडली!

नवी दिल्ली, 27 ऑगस्ट : नव्या नवरीला घेऊन हनिमूनसाठी गेलेल्या तरुणासोबत धक्कादायक प्रकार झाल्याचं समोर आलं आहे. त्यानेच केलेल्या चुकीमुळे त्याची थेट तुरुंगात रवानगी झाली. आपल्या चुकीमुळे हा तरुण बायकोसोबत वेळ घालवण्याऐवजी तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हनिमूवर गेलेल्या व्यक्तीला सेक्स वर्करसह संबंध ठेवण्याचा प्रयत्न महागात पडला आहे. त्याला त्याच वेळ अटक करण्यात आली. अमेरिकेतील फ्लोरिडामधून हा प्रकार समोर आला आहे. फ्लोरिडामध्ये प्रॉस्टिट्यूशन स्टिंग केलं जात आहे. ज्यात हा तरुण पुरता अडकला आणि हनिमूनला बायकोला वेळ देण्याऐवजी पोलीस कस्टडीत आहे.

आरोपी 34 वर्षांचा आहे. त्याचं नुकतच लग्न झालं. तो पत्नीसोबत हनिमूनवर होता. यादरम्यान त्याला मोबाइलवर स्टिंग करणाऱ्या अंडर कव्हर डिटेक्टिवकडून पाठवलेली जाहिरात दिसली. ज्यात प्रॉस्टिट्यूटची माहिती देण्यात आली होती. आरोपी तरुण या जाळ्यात अडकला आणि पत्नीला हॉटेलच्या खोलीत झोपलेल्या अवस्थेत सोडून जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर पोहोचला आणि तेथेच त्याला अटक करण्यात आली.

भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, 1 हजार 40 वेळा WhatsApp Call; थेट पतीचीच दिली सुपारी

या स्टिंगच्या माध्यमातून 176 जणांना अटक..

सेक्स क्राइम रोखण्यासाठी हिल्सबोरो काउंटी शेरिफ कार्यालयातून चालविल्या जाणाऱ्या या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून आतापर्यंत 176 जणांना अटक करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात या स्टिंगची सुरुवात करण्यात आली होती. या स्टिंगच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींसोबत शरीर संबंध ठेवणाऱ्यांचा शोध घेतला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *