नवरात्र मोहत्सवाच्या निमित्त पालम डाक विभागाकडून सुकन्या खाते उघडण्याची विशेष मोहीम

परभणी

 

शांतीलाल शर्मा
पालम :- तालुक्यातील नागरिकां साठी आवाहन दिनांक 17/10/2020 पासून ते 25/10/2020 पर्यंत नवरात्र उत्सव हा माँ दुर्गेचे उपासना करून आपण सर्वत्र सन
साजरा करतोत आपल्या भारतीय संस्कृती मध्ये स्त्रियांना मोठा सन्मान या नवरात्र मोहोत्सवात आपण देत असतो त्याचाच एक भाग म्हणून डाक विभागाने केंद्र सरकारच्या बेटी बचाव बेटी पढाव या अनुषंगाने भारतीय डाक विभागाकडून नवरात्राच्या काळामध्ये सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे ,
सुकन्या खाते 0 -10 वर्ष वयोगटाच्या मुलींसाठी रु 250 केवळ भरून आपण पोस्ट ऑफिस मध्ये काढू शकता तरी मुलींच्या उज्वल भविष्यासाठी, शिक्षणासाठी योजने अंतर्गत पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडावेत असे आवाहन पालम डाक विभागाचे एस.पी.एम. श्री दिगंबर माने यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *