नदीत पोहायला गेलेल्या मुलाच्या नाकात शिरला किडा; पूर्ण डोकं पोखरल्याने मृत्यू

मुंबई 21 ऑगस्ट : नदीमध्ये पोहल्यानंतर घरी परतलेल्या 13 वर्षीय मुलाची प्रकृती अचानक बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलाच्या डोक्यात ‘ब्रेन इटिंग अमिबा’ शिरला होता. त्यामुळे त्याच्या शरीरात संसर्ग पसरला आणि नंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
द मिररच्या वृत्तानुसार, हे प्रकरण अमेरिकेतील नेब्रास्का येथील आहे, जिथे एक 13 वर्षांचा मुलगा Elkhorn नदीत आंघोळीसाठी गेला होता. आंघोळीच्या वेळी नाकातून किडा त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचला. नंतर मुलाच्या शरीरात संसर्ग पसरला आणि या संसर्गामुळे 10 दिवसांनी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
Wardha Farmer Suicide : केंद्रीय पथक, फडणवीस, सगळे आले पण मदत नसल्याने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे पसरणाऱ्या दुर्मिळ प्रकारच्या संसर्गामुळे मुलाचा मृत्यू झाला. डग्लस काउंटीच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, मुलाला प्राइमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस (PAM) नावाचा दुर्मिळ मेंदू संसर्ग झाला होता. हा संसर्ग Naegleria Fowleri amoeba मुळे होतो.
हा अमिबा इतका धोकादायक आहे की तो मेंदूच्या पेशी खातो, ज्यामुळे मानवी मेंदूमध्ये संसर्ग पसरतो आणि मृत्यू होतो. Naegleria फॉलेरी अमिबा इतका लहान आहे की तो सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसत नाही. पण हा छोटा किडासुद्धा माणसाला मारण्यास सक्षम आहे.
Virar Crime : धक्कादायक! प्रवासाचे भाडे मागणाऱ्या रिक्षाचालकावरच प्राणघातक हल्ला
आरोग्य अधिकारी म्हणतात की अमिबा पाण्यात नाकातून शरीरात प्रवेश करू शकतो, नंतर तो नाकातून मेंदूपर्यंत जातो. ‘मेंदू खाणारा कीडा’ अनेकदा उबदार गोड्या पाण्यातील तलाव, नद्या, कालवे आणि तलावांमध्ये आढळतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.