Pune police arrested two people under the MOCCA

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : खेडदिगर येथून चोरलेले वाहन धुळे येथे विक्रीसाठी नेताना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी मध्य प्रदेशातील चोरट्याला वाहनासह ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक किरण खेडकर यांनी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 13 डिसेंबररोजी खेडदिगर गावातील हिरा मोती फर्टिलायझरच्या बाजूला पंडीत गंगाराम चौधरी यांनी पिकअप वाहन (MH 39 C 5583) लावले होते. येथून हे वाहन अज्ञात चोरटयाने चोरुन नेले होते. या प्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, पिकअप वाहन सुनिल पावरा, पिंटु ओंकार भिल (रा. बेहडीया, ता. पानसेमल, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) यांनी चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच सुनिल पावरा हा खेडदिगर गावात फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ संशयिताला मारुती मंदिराजवळ ताब्यात घेतले. त्याने पिंटु ओंकार भिल याच्या मदतीने खेडदिगर येथून पिकअप वाहन चोरल्याची कबुली दिली. पोलीस पिंटू भिलचा शोध घेत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस हवालदार विनोद जाधव, सजन वाघ, पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव, गोपाल चौधरी, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली.

हेही वाचलंत का ? 

  • अमरावती : सम्मेद शिखरजी तीर्थस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याविरोधात जैन समाजाचा मूक मोर्चा
  • Kuttey song : अर्जुन कपूरच्या आगामी ‘कुत्ते’ चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज (video)
  • कागद पत्रांसाठी सामान्य नागरिकांना नाचवू नका, तत्परतेने सेवा द्या नितीन गडकरी यांनी उपटले बँक कर्मचाऱ्यांचे कान