कुणाल पाटील www.pudhari.news
धुळे : मोघण येथे विविध विकासकामांचे भूमीपुजन व उद्घाटन करताना आ. कुणाल पाटील. समवेत पंचायत समिती सदस्य व ग्रामस्थ. (छाया: यशवंत हरणे)

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मोघण येथे 55 लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेसह आमदार निधीतून मंजुर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमीपुजन व उद्घाटन आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील पाझर तलावासाठी जलसिंचन विभागाकडून 2 कोटी 50 लाख रुपयांचा निधीदेखील मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली.

मोघण येथे आ. कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून विविध विकास कामे मंजुर करण्यात आली आहेत. या कामांचे आ. पाटील यांच्या हस्ते भूमीपुजन व उद्घाटन करण्यात आले. मोघण गावाचा पाण्याचा प्रश्‍न सुटावा म्हणून शासनाकडे पाठपुरावा जलजीवन मिशन अंतर्गत गावात पाईपलाईन व पाणीपुरवठा योजना मंजुर करण्यात आली आहे. या योजनेसाठी एकूण 55 लक्ष रुपयांचा निधी मंजुर झाला असून त्याप्रमाणे आमदार निधीतून पेव्हर ब्लॉक बसविणे (10 लक्ष रुपये), आमदार निधीतून सभामंडप बांधणे (8 लक्ष रुपये), तसेच 15 वा वित्त आयोगाच्या निधीतून भूमीगत गटार, जि.प.शाळा दुरुस्ती, अंगणवाडी आवारात पेव्हर ब्लॉक बसविणे अशा विविध विकास कामांचे उद्घाटन व भुमीपुजन आ. पाटील यांच्या हस्ते यावेळी झाले. कार्यक्रमास पं.स.चे माजी सभापती भगवान गर्दे, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, पं.स.सदस्य दिलीप देसले, मनपा माजी विरोधी पक्षनेते गुलाब माळी, उपसरपंच कृष्णकांत माळी, ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र भदाणे, जि.प.सदस्य प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते.

पाझर तलावासाठी निधी…
धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, मोघण गावाच्या शिवारातील मोठ्या पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी जलसंधारण विभागाच्यावतीने एकूण 2 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. या कामामुळे शेतकर्‍यांच्या शेती सिंचनाला मोठा फायदा होणार आहे.

हेही वाचा:

  • धुळ्याच्या उपमहापौर पदावर भाजपाचे नागसेन बोरसे यांची निवड
  • ‘ठरलं तर मग’ : अभिनेत्री जुई गडकरीने दिग्दर्शकांना दिली अनोखी भेट
  • WTC फायनलच्या शर्यतीतून पाकिस्तान बाहेर, टीम इंडियाला मोठा फायदा