धक्कादायक! 200 फूट उंचीवर 2 विमानांची धडक, 2 जणांचा मृत्यू

धक्कादायक!-200-फूट-उंचीवर-2-विमानांची-धडक,-2-जणांचा-मृत्यू

कॅलिफोर्निया : दोन विमानांची एकमेकांना धडक झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अपघातानंतरचा व्हिडीओ देखील समोर आला. ही दुर्घटना लॅण्डिंगपूर्वी घडली. जवळपास 200 फूट उंचीवर 2 विमानं एकमेकांना धडकली. या दुर्घटनेत विमानाचं मोठं नुकसान झालं. तर दोन जणांना जीव गमवावा लागला.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया इथे गुरुवारी विमानतळावर विमान लॅण्ड करताना भीषण दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. दोन विमानांची समोरासमोर धडक झाली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात वॉटसनविले म्यूनिसिपल विमानतळावर झाला.

एका विमानात दोन लोक होते. तर दुसऱ्या विमानात फक्त वैमानिक होता. या अपघाताचं नेमकं कारण अजून समोर आलं नाही. या दुर्घटनेनंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेनंतरचा व्हिडीओ समोर आला आहे.

सुखी संसाराची स्वप्न भंग..! नवविवाहित दाम्पत्याच्या कारवर कोसळला 80 टन काँक्रीटचा गर्डर

🇺🇸| Múltiples muertes después de que dos aviones chocaran en el norte de California mientras intentaban aterrizar en un aeropuerto local. pic.twitter.com/w1Gf6JjRAW

— Alerta News(@Alerta_News_) August 19, 2022

या व्हिडीओमध्ये एक दुर्घटनाग्रस्त विमान मैदानात पडल्याचं दिसत आहे. तर दुसरं दुर्घटनाग्रस्त विमान हे एका छोट्या इमारतीमध्ये घुसलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विमानतळावर लॅण्डिग आणि टेक ऑफचं मार्गदर्शन करण्यासाठी एकही कंट्रोल टॉवर उपलब्ध नाही.

काळ आला होता पण वेळ नाही! अवघ्या 10 सेकंदावर मृत्यू फक्त 8 पावलांमुळे वाचला जीव; Watch Video

या भागात 4 रनवे आहेत आणि इथे 300 हून अधिक विमानांचं लॅण्डिंग केलं जातं. या दुर्घटनेची माहिती मिळताच कॅलिफोर्नियाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *