देशमुखजी, जेलमधून बाहेर येताच 100 खोक्यांच्या प्रकरणात कोण-कोण होतं, त्यांची नावं जाहीर करा

देशमुखजी,-जेलमधून-बाहेर-येताच-100-खोक्यांच्या-प्रकरणात-कोण-कोण-होतं,-त्यांची-नावं-जाहीर-करा

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जेलबाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. त्यावर शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधवांची टीका केलीये…

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जेलबाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा (Anil Deshmukh Bail) झालाय. त्यावर शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधवांची (Prataprao Jadhav) टीका केली आहे. जेलमधून बाहेर आल्यावर 100 खोक्यांमध्ये कोण कोण होते त्यांची नावं अनिल देशमुखांनी जाहीर करावी, असं प्रतापराव जाधव म्हणालेत.

100 वसूली प्रकरणात आतापर्यंत फक्त अनिल देशमुख, सचिन वाझे यांचीच नावं पुढं आली आहेत. इतरांची नावंही जनतेला सांगा, असं जाधव म्हणालेत.

अनिल देशमुख यांना जामीन

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला. अनिल देशमुख यांच्या जामीनाला स्थगिती देण्याबाबत सीबीआयने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सीबीआयची ही याचिका मुंबई हायकोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा जेलबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देशमुख जेलबाहेर येतील. उद्या त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.

आमच्याकडे बॉम्ब आहेत. योग्यवेळी आम्ही ते फोडू, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावरही प्रतापराव जाधव यांनी टीका केलीय. संजय राऊतांकडे बॉम्ब तर सोडाच पण लवंगी फटाकाही नाहीये, असं जाधव म्हणालेत.

संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. सत्ता गेल्यापासून संजय राऊत बावचाळले आहेत. संजय राऊतांना आता काही कामं राहिलं नाही, असं प्रतापराव जाधव म्हणालेत.

शिंदेगटाच्या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यबाबत प्रतापराव जाधव बोलले. सगळे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले. त्यांनी मतदारसंघातील अडचणी जाणून घेतल्या, आज विधानसभेत ठराव मांडला म्हणून मराठी भाषिकांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचे आभार मानले,असं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *