दुष्काळात 13 वा महिना, राज्यातील निवासी डॉक्टर संपावर जाणार? या आहेत मागण्या

मुंबई, 27 डिसेंबर : देशाभरासह राज्यभरात कोरोनाचे संकट घोगावत असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टरांनी 2 जानेवारीपासून संपावर जाण्याचा राज्य सरकारला इशारा दिला आहे. सेन्ट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देत याबाबत माहिती देण्यात आली आहे.
विविध मागण्यांसाठी मागील एका वर्षापासून मंत्र्यांसोबतच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका होऊनही प्रतिसाद न दिल्याने संपाचे हत्यार उगारले आहे. अधिवेशन काळात मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. निवासी डॉक्टर संपावर गेल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढणार आहे.
हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांचं कौतुक तर मुख्यमंत्र्यांवर संतापले अजित दादा, म्हणाले ही जबाबदारी…
काय आहेत निवासी डाॅक्टरांच्या मागण्या?
वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1 हजार 432 जागांची पदनिर्मिती झाली नाही. दरम्यान मागच्या काही काळापासून शासनाकडे हा प्रस्ताव धुळखात पडला आहे. शासकीय आणि महाविद्यालयात अपुऱ्या आणि मोडकळीस आलेल्या वसतीगृहामुळे विद्यार्थ्यांची मोठे नुकसान होत आहे. यावर लवकरातलवकर निर्णय घेण्यात यावा ही मागणी करण्यात आली आहे.
सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यपकांची पदेच भरली नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ही अपुरे पदे तातडीने भरणे तसेच मागच्या कित्येक वर्षांपासून निवासी डॉक्टरांना महागाई भत्ता देण्यात आला नाही तो देण्यात यावा ही मागणी करण्यात आली आहे. वरीष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करत सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करण्यात यावे असे निवेदनात सांगितलं आहे.
हे ही वाचा : अखेर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर ठराव एकमताने मंजूर.. पण ठाकरेंची मागणी नाकारली
राज्यातील मार्डच्या निवासी डॉक्टरांनी 2 जानेवारीपासून संपाची घोषणा केली आहे. राज्य सरकारने विविध मागण्यांची पूर्तता न केल्याने मार्डचा संपाचा निर्धार केला आहे. डॉक्टरांची संख्या कमी आहे, अशातच उपलब्ध डॉक्टरांवर अधिक ताण येतोय. त्यामुळे रोष व्यक्त करण्यासाठी आणि प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी संपावर जात असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.