दीपिका चिखलिया यांना नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले…

- मुख्यपृष्ठ
- करमणूक  / बॉलीवूड – bollywood news
- Dipika Chikhlia: रामायण फेम अभिनेत्री दीपिका चिखलिया यांना नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले…
Dipika Chikhlia: रामायण फेम अभिनेत्री दीपिका चिखलिया यांना नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले…
दीपिका (Dipika Chikhlia) यांनी नुकताच एक खास व्हिजीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये दीपिका या ‘ओ मेरे शोना रे’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
Dipika Chikhlia
Dipika Chikhlia: रामायण या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेमध्ये सीता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) या सोशल मीडियावर सक्रिय असतात. दीपिका यांनी नुकताच एक खास व्हिजीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये दीपिका या ‘ओ मेरे शोना रे’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दीपिका यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
दीपिका चिखलिया यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या ‘ओ मेरे शोना रे’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या व्हिडीओला दीपिका यांनी कॅप्शन दिलं, ‘आयुष्य हे एका गाण्यासारखं आहे. ते गाणं गायचं आणि त्यावर डान्स करायचा.’ व्हिडीओमध्ये दीपिका या नाकात नथ, पिवळा ड्रेस आणि गोल्डन इरिंग्स आशा लूकमध्ये दिसत आहेत. दीपिका यांच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स:
दीपिका चिखलिया यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एक नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘जसं तुमचं वय वाढत आहे, तशी तुमची प्रतिमा का बदलत आहे?’, तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘दिपका जी, प्रत्येकाला तुमच्यात माता सीतेचे रूप दिसते. तुम्ही हे करू नका.’
News Reels
पाहा व्हिडीओ:
रामायण मालिकेबरोबरच दीपिका यांनी रुपये दस करोड, घर का चिराग आणि खुदाई या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Adipurush Controversy: ‘पात्र जर श्रीलंकेचं असेल, तर ते मुघलांसारखं दिसता कामा नये!’; ‘आदिपुरुष’च्या टीझरवर दीपिका चिखलिया यांची प्रतिक्रिया