दिशा सालियान प्रकरण अचानक चर्चेत कसं आलं?, राऊतांनी नेमकं कारण सांगितलं

दिशा-सालियान-प्रकरण-अचानक-चर्चेत-कसं-आलं?,-राऊतांनी-नेमकं-कारण-सांगितलं

मुंबई, 25 डिसेंबर :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अधिवेशनात दिशा सालियान प्रकरण चांगलंच गाजलं होतं. या प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दिशा सालियान प्रकरणाची एसआयटी चौकशी होईल अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावरून आक्रमक होत संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. एसआयटी नव्हे तर इंटरपोलकडे जरी केस दिली तरी हरकत नाही. त्या विषयाशी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंचा काडीमात्र संबंध नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मात्र अशा विषयांवर महाराष्ट्राच्या विधानसभेत चर्चा का होते असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

नेमकं काय म्हटलं संजय राऊत यांनी? 

संजय राऊत पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत, त्यांनी  दिशा सालियान प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एसआयटी नव्हे तर इंटरपोलकडे जरी केस दिली तरी हरकत नाही. त्या विषयाशी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंचा काडीमात्र संबंध नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या हिताचा सीमावादाचा प्रश्न विधानसभेत का उपस्थित केला जात नाही? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या नेत्यांबद्दल शिवराळ भाषा वापरली जाते, आम्हाला देशद्रोही ठरवलं जातं. मात्र आमचे मुख्यमंत्री दिशा सालियान आणि अन्य विषयात गुंतून पडलेत असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

हेही वाचा :  सिद्धिविनायक मंदीर प्रकरणी ठाकरे गटाचे आदेश बांदेकर अडचणीत, मनसेकडून गंभीर आरोप

‘राज्यपालांची एसआयटी चौकशी करा’   

पुढे बोलताना राज्यपालांविरोधात एसआयटी स्थापन करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. राज्यात सुरू असलेला महापुरुषांचा अवमान, मुख्यमंत्र्यांचा 16 भूखंडांचा व्यवाहार आणि इतर महत्त्वाच्या विषयावरून लक्ष हटावं, विरोधी पक्षाला त्यावर बोलता येऊ नये यासाठी असे विषय विधानसभेत मांडले जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *