दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे आक्रमक, आरोप करणाऱ्यांना असं घेरणार!

दिशा-सालियान-प्रकरणात-आदित्य-ठाकरे-आक्रमक,-आरोप-करणाऱ्यांना-असं-घेरणार!

नागपूर, 25 डिसेंबर : नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनीही या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे, यानंतर आता या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात होत असलेल्या आरोपांना आदित्य ठाकरे कायदेशीर उत्तर द्यायच्या तयारीत आहेत.

आरोप करणाऱ्यांवर आदित्य ठाकरे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात शिंदे-फडणवीस सरकारची आदित्य ठाकरेंना घेरण्याची व्यूहरचना आहे. या व्यूहरचनेला आदित्य ठाकरे कायदेशीर कारवाई करून प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत.

दिशा सालियान प्रकरण संसदेत

शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेमध्ये दिशा सालियान प्रकरणाचा उल्लेख केला. सुशांत सिंह राजपूत मृत्यूआधी रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू या नावाने बरेच फोन करण्यात आले होते. यातला एयू कोण आहे? बिहार पोलिसांनी एयू म्हणजे आदित्य उद्धव असं सांगितलं होतं, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली.

आदित्य टार्गेट होताच उद्धव ठाकरे ऍक्शनमध्ये, भात्यातले सगळे बाण घेऊन मैदानात!

राहुल शेवाळे यांच्या या मागणीनंतर त्याचे पडसाद राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. शिंदेंची शिवसेना तसंच भाजप आमदार नितेश राणे या मुद्द्यावरून आक्रमक झाले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करणार असल्याची घोषणा सभागृहात केली. राणे कुटुंबियांकडून दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात वारंवार आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं जात आहे. वारंवार होत असलेल्या या आरोपांनंतर आदित्य ठाकरे अब्रुनुकसानीचा दावा करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *