दिशा सालियान केस पुन्हा ओपन करा, नितेश राणेंची थेट मागणी

दिशा-सालियान-केस-पुन्हा-ओपन-करा,-नितेश-राणेंची-थेट-मागणी

मुंबई, 22 डिसेंबर : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रिया चक्रवर्तीला जे कॉल आले ते  AU नावाने होते असं त्यांनी म्हटलं आहे. यावरून अधिवेशनामध्ये गोंधळ सुरू असून, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. आता या वादात भाजप नेते नितेश राणे यांनी देखील उडी घेतली असून, त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात फक्त आदित्य ठाकरे यांचंच नाव का घेतलं जात आहे? इतर राजकीय नेत्यांची नावं का घेतली जात नाहीत असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. सोबतच दिशा सालियान केस मुंबई पोलिसांकडे आहे, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की त्यांनी ही केस पुन्हा ओपन करावी असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं नितेश राणे यांनी? 

नितेश राणे यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  सुशांत सिंग राजपूत प्रकरणात फक्त आदित्य ठाकरे यांचंच नाव का घेतलं जात आहे? इतर राजकीय नेत्यांची नावं का घेतली जात नाहीत असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा सत्य बाहेर येईल, दिशा  सालियानची केस सध्या मुंबई पोलिसांकडे आहे, त्यामुळे ती पुन्हा ओपन करावी अशी वनंती मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करतो असं राणे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा:  नितेश राणेंच्या ‘त्या’ आरोपांमुळे राहुल शेवाळे येऊ शकता अडचणीत?

ठाकरे गटावर निशाणा 

दरम्यान नितेश राणे यांनी यावेळी ठाकरे गटावर देखील निशाणा साधला आहे.  सत्तेचा वापर करून महिलांचे शोषण करायचे आणि न्याय द्यायची वेळ आली तर आरोप करायचे, हीच उध्दव ठाकरे सेना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राहुल शेवाळे मातोश्रीचे किचन कॅबिनेट होते. ते जेव्हा खोके पोहोचवायचे तेव्हा त्यांना किंमत होती, मात्र आता आदित्य ठाकरे शेवाळे यांना किंंमत देत नसल्याचं म्हणत आहेत असा घणाघात देखील नितेश राणे यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *