दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे कायदेशीर उत्तरं देण्याच्या तयारीत, अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची शक्यता

दिशा-सालियन-प्रकरणी-आदित्य-ठाकरे-कायदेशीर-उत्तरं-देण्याच्या-तयारीत,-अब्रुनुकसानीचा-दावा-दाखल-करण्याची-शक्यता

दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे कायदेशीर उत्तरं देण्याच्या तयारीत, अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची शक्यता

दिनेश दुखंडे

दिनेश दुखंडे | Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Updated on: Dec 25, 2022 | 11:53 PM

आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई हे नागपुरात येत आहेत.

दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे कायदेशीर उत्तरं देण्याच्या तयारीत, अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची शक्यता

आदित्य ठाकरे

मुंबई : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे कायदेशीर उत्तरं देण्याच्या तयारीत आहेत. आदित्य ठाकरे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची शक्यता आहे. या प्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याची व्यूव्हरचना आदित्य ठाकरे यांनी आखल्याचं कळतं. आदित्य ठाकरे आरोप करणाऱ्यांना कायदेशीर उत्तरं देण्याच्या तयारीत आहेत. दिशा सालियन प्रकरणात होत असलेल्या आरोपांना आदित्य ठाकरे कायदेशीर उत्तर देण्याच्या तयारीत आहेत. आरोप करणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचा दावा करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी घोषित केलेली आहे. या सगळ्या प्रकरणाचे विधिमंडळात पडसाद उमटत आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारनं आदित्य ठाकरे यांना घेरण्याची व्यूव्हरचना अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात पाहायला मिळाली. उद्यापासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होत आहे. त्यात सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी आदित्य ठाकरे हे हत्यार उपसण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात विधिमंडळ कामकाजदरम्यान दिशा सालियन प्रकरण समोर आलं. या प्रकरणी एसआयटी चौकशी नेमण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांना शिंदे-फडणवीस सरकारनं घेरण्याचा प्रयत्न केला होता.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाची ताकत वाढावी आणि  आदित्य ठाकरे यांच्या पाठीमागे नैतिक पाठबळ उभं करावं. आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई हे नागपुरात येत आहेत.

खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. अभिनेता सुशांत सिंग राजपुतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला एयू नावानं ४४ वेळा फोन आले होते. हा  एयू म्हणजे आदित्य-उद्धव असल्याची माहिती बिहार पोलिसांनी दिल्याचा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *