दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकरांच्या लेकीची भावुक पोस्ट; म्हणाली, प्रत्येक दिवशी…

मुंबई, 23 डिसेंबर : नाटक, सिनेमा तसेच टेलिव्हिजनवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर. असंभव, मला सासू हवी सारख्या मालिकेतून आनंद अभ्यंकर घराघरात ओळखले गेले. अनेक हिंदी मालिका सिनेमात त्यांनी उत्तम काम केलं. ‘मला सासू हवी’ ही त्यांच्या अभियन कारकिर्दीतील शेवटची मालिका ठरली. आनंद अंभ्यकरांच्या निधनाला आज 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 24 डिसेंबर 2012 रोजी मला सासू हवी मालिकेच्या शुटींगहून परत जात असताना आनंद अभ्यंकर यांचं मुंबई पुणे महामार्गावर अपघाती निधन झालं. त्यांच्याबरोबर मालिकेतील तरुण अभिनेता आनंद पेंडसेचं निधन झालं. दोघांच्या अकाली जाण्यानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा निर्माण झाली आहे.
आनंद अभ्यंकर सारख्या तगड्या कलाकारांच्या जाण्यानं सिनेसृष्टीत निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. आनंद अभ्यंकर यांच्या मृत्यू पश्चात त्यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा आहे. लेकीचं काही वर्षांपूर्वीचं लग्न झालं. तिला गोंडस मुलगी आहे. आज वडिलांच्या 10 स्मृर्तीदिनी मुलगी सानिकानं भावुक पोस्ट लिहिली आहे. सोबत आनंद अभ्यंकरांचा एक थ्रो बॅक व्हिडीओही शेअर केलाय.
हेही वाचा – सुख म्हणजे काय असतं फेम गौरी अभिनयाव्यतिरिक्त करते हे काम; Video एकदा पाहाच
सानिकानं म्हटलंय, ‘बाबा तुझ्याशिवाय 10 वर्ष ही अतिवास्तव वाटतात. तू आमच्याबरोबर आहेस, आमच्या हृदयात आणि मनात, आमच्या बोलण्यात आणि शांततेत आहेस. तुम्ही आम्हाला कायम प्रेरणा देत राहता. तुमच्याशिवाय आमतंआयुष्य कसं घडलं याचा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल!’.
सानिकानं पुढे लिहिलंय, ‘पण मला वाईट वाटतं की तुम्ही किती चांगले आजोबा असता हे आम्ही पाहू शकलो नाही. पण मला खात्री आहे की तुम्ही एरिशाला बिघडवलं असतं. तिची मोठी होण्याची आणि आजोबांना जाणून घेण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. आम्हाला प्रत्येक दिवशी तुमची आठवण येते पण तुमचा वारसा कायम आहे. आपण परत भेटेपर्यंत प्रेम – सानू. निज्जू. अंजू’
आनंद अभ्यंकरांची मुलगी सानिका हिनं कथ्थक नृत्यात विशारद केलं आहे. तर मुलगा निरज देखील मॉडेलिंग आणि डान्स मध्ये करिअर करत आहे. सानिकाचं लग्न झालं असून तिला एरिशा ही मुलगी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.