दादा भुसे अडचणीत? तरुणांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारल्याचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई, 27 डिसेंबर : मागच्या काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार व्हाव लागल्यापासून भाजप आणि शिंदे गटाकडून महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांवर जोरदार आरोप होत आहेत. दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांवर आरोप केले जात आहेत. अशातच मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप होत असतानाच आता शिंदे गटाचा आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे.
राज्याच्या सुरू असेलल्या हिवाळी अधिवेषनावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले. यानंतर आता मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ ट्वीट केले आहे. तरुणाला धमकावल्याचा आरोप त्या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हाड यांच्याकडून करण्यात आला आहे. विरोधकांकडून शिंदे गटाच्या दुसऱ्या एका मंत्र्यावर आरोप केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : Abdul Sattar : चार तास स्वत:ला कोंडून घेतलेले अब्दुल सत्तार अवतरले, बाहेर येताच म्हणाले…
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटरवर एक व्हिडिओ शेयर केला असून त्यात मंत्री भुसे हे तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान हा व्हिडिओ सध्याचा आहे की जुना आहे याबाबत कोणताही खुलासा झाला नाही. परंतु आव्हाडांनी हा व्हिडिओ मागच्या काही तासांपूर्वी ट्वीटरवर टाकला आहे.
मंत्री दादा भूसे फटकावतात . शिव्या देतात मुख्यमंत्री साहेब कुठला गुन्हा पोलिस घेणार पोलिसां समोर मारले माझा नग्न फोटो fb वर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलत #सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौझ उभी केलीत supreme court मध्ये रात्री त्या विकृत बरोबर आपली बैठक आता बोला .. pic.twitter.com/EGsJmvApfI
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 26, 2022
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ शेयर करत म्हटलं आहे की, मंत्री दादा भूसे फटकावतात. शिव्या देतात. मुख्यमंत्री साहेब, कुठला गुन्हा पोलिस घेणार? असा सवाल आव्हाड यांनी केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, मंत्री दादा भुसे हे दोन तरुणांना शिव्या देत असून त्यात त्यांनी एका तरुणाच्या कानाखाली मारली आहे.
हे ही वाचा : संजय राऊतांचा बॉम्ब फुसका ठरला; उद्धव ठाकरेंनीही वेळ मारून नेली!
त्यामुळं आता राष्ट्रवादीने हा व्हिडिओ शेयर करत मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे. याशिवाय हिवाळी अधिवेशनातही या विषयारून विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.