दरेकर, नार्वेकर, लोढांना मोठा दिलासा; 'या' प्रकरणातून निर्दोष मुक्तता

दरेकर,-नार्वेकर,-लोढांना-मोठा-दिलासा;-'या'-प्रकरणातून-निर्दोष-मुक्तता

मुंबई, 18 डिसेंबर : भाजप आमदार प्रवीण दरेकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दरेकर, राहुल नार्वेकर व मंत्री लोढा यांच्यासह सात जणांची मालेगाव हिंसाचाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत करण्यात आलेल्या आंदोलनप्रकरणी दाखल गुन्ह्यातून न्यायालयानं निर्देष सुटका केली आहे. त्रिपुरामध्ये हिंसाचा झाला होता, त्याचे पडसाद मालेगावमध्ये उमटले होते. त्याचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीनं मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आलं होतं.

नेमकं  प्रकरण काय? 

त्रिपुरामध्ये झालेल्या हिंसाचाराचे पडसाद मालेगावमध्ये उमटले होते. मालेगावमध्ये देखील हिंसाचार आणि दगडफेक झाली. याचा निषेध करण्यासाठी मुंबईत भाजपाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलन प्रकरणात मुंबई पोलिसांनी भाजप आमदार प्रवीण दरेकर, भाजपाचे माजी मुंबई शहर अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार राहुल नार्वेकर, माजी नगरसेवक आकाश पुरोहित, अतुल शहा, राजेश शिरवळकर आणि शरद चेतनकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा  :  मविआमध्ये वंचितला घ्यायला 2 पक्षांचा विरोध, प्रकाश आंबेडकरांनी नाव केली उघड

निर्दोष मुक्तता 

पोलिसांकडून आंदोलनप्रकरणात भाजप नेत्यांवर आयपीसी कलम  269, 447, 37(1) (3), 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या सर्वांची कुठलेही पुरावे नसल्यानं न्यायालयानं निर्देष मुक्तता केली आहे. गिरगांव महानगर दंडाधिकारी न्यायाधीश एन ए पटेल यांनी शनिवारी हा निर्णय दिला आहे. अॅड अखिलेश चौबे यांनी या प्रकरणात भाजपची बाजू मांडली होती. न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्यानं  भाजप आमदार प्रवीण दरेकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *