'त्याने माती खाल्ली यात…' प्रसादमुळे चढला महेश सरांचा पारा; नक्की काय झालं ?

मुंबई, 24 डिसेंबर : टेलिव्हिजनचा सर्वात वादग्रस्त्र शो म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात ते म्हणजे बिग बॉस. बिग बॉस हिंदी नंतर मराठीतही बिग बॉस सुरू करण्यात आलं. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनबाबत प्रेक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन पाहून फेअर आणि अनफेअरवरून सोशल मीडियावर चांगलंच ट्रोलिंग सुरू आहे. आता या आठवड्याच्या चावडीवर महेश सर पूर्ण आठवड्याचा हिशोब मांडणार आहेत.
बिग बॉसचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये महेश सर प्रसादला खडे बोल सुनावत आहेत. या आठवड्यात यंदाच्या सीझनमधलं शेवटचं कॅप्टन्सी टास्क पार पडलं. यामध्ये आरोह वेलणकर जिंकला असला तरी बिग बॉसच्या होणाऱ्या विजेत्याचं मात्र चांगलंच नुकसान होणार आहे. स्पर्धकांना कॅप्टन की बक्षिसाची रक्कम यातील एक पर्याय निवडायचा होता. सदस्यांनी बझर वाजवून कॅप्टनी कार्यातून बाद होत बक्षिसाची रक्कम कायम ठेवायची होती. पण यातच प्रसाद जवादे मुळे बक्षिसाची रक्कम अर्ध्यावरच आली.
हेही वाचा – Rang Maza Vegla: अखेर दीपा कार्तिक पुन्हा बांधणार लग्नगाठ; मुलींसोबत करणार नव्या आयुष्याची सुरुवात
प्रोमोमध्ये महेश सर याच कॅप्टन्सी टास्क विषयी बोलत आहेत. महेश सर म्हणतात कि, ‘साडे सोळाचे आठ व्हायला कारणीभूत प्रसादच होता. हा माणूस काहीही बडबडतो आणि दुसऱ्यांना कन्फ्युज करतो.’ त्यावर अक्षय म्हणतो कि, ‘आरोह एकदम बरोबर होता पण प्रसादने पूर्णपणे माती खाल्ली.’ त्यावर भडकत प्रसाद अक्षयच्या अंगावर धावून जातो. पण त्याला ‘शट अप’ असं म्हणत महेश सर म्हणतात ‘मी पुष्कर जोग नाही ऐकून घ्यायला. मी थेट आतमध्ये येईन.’
कॅप्टन्सीचा टास्क असा होता ज्यात कॅप्टन की बक्षिसाची रक्कम यातील एक पर्याय सदस्यांना निवडायचा होता. सदस्यांनी बझर वाजवून कॅप्टनी कार्यातून बाद होत बक्षिसाची रक्कम कायम ठेवायची होती. टास्क सुरू झाल्यानंतर 20 सेकंदांनी 24 लाख रक्कम वाचवत अक्षय केळकरने कॅप्टन्सी कार्यातून माघार घेत त्याच्या नावाची पाटी एटीएम मशिनमध्ये टाकली. त्यानंतर पुढच्या 10 सेकंदात किरण माने व अपूर्वा नेमळेकर कॅप्टन्सी कार्यातून बाहेर पडले.
आरोह वेलणकर व प्रसाद जवादे यांच्यात टास्कमध्ये माघार घेण्यावर वाद झाले. बक्षिसाची रक्कम आठ लाखावर आल्यानंतर प्रसाद कॅप्टन्सी कार्यातून बाहेर पडला. त्यानंतर 10 सेकंदात अमृता धोंगडेनेही तिच्या नावाची पाटी एटीएम मशीनमध्ये टाकली. कॅप्टन्सी कार्यात आरोह वेलणकर विजयी ठरल्यामुळे तो घरातील शेवटचा कॅप्टन ठरला आहे. परंतु, आता ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वाच्या विजेत्याला ट्रॉफी व केवळ आठ लाख रुपये मिळणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.