…त्यानंतर आफताबने श्रद्धाला संपवलं, पोलिसांना मिळाली 'ऑडिओ' क्लिप

…त्यानंतर-आफताबने-श्रद्धाला-संपवलं,-पोलिसांना-मिळाली-'ऑडिओ'-क्लिप

Shraddha Walkar And aftab Poonawala : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा (Shraddha Walkar Murder case) तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या (Delhi police) हाती एक महत्त्वाचा पुरावा हाती लागला आहे. पोलिसांना आरोपी आफताब पूनावालाचा (Aftab Poonawala) एक ऑडिओ क्लिप मिळाली आहे. यातून श्रद्धाची हत्या करण्यापूर्वी दोघांमध्ये नक्की काय घडलं होतं, याचीही माहिती समोर आलीये.

मूळची मुंबई जवळच्या वसईतील असलेल्या श्रद्धा वालकर या तरुणीची तिच्याच लिव्ह-इन पार्टनरने हत्या केली. श्रद्धा वालकरच्या हत्येनं देशभरात खळबळ उडाली होती. आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले होते.

श्रद्धा वालकरची हत्या केल्याप्रकरणी आफताब पूनावाला सध्या तुरुंगात असून, दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आफताब पूनावालाविरुद्ध पुरावे गोळावे करण्याचं काम दिल्ली पोलिसांकडून सुरू असून, एक महत्त्वाचा पुरावा दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे.

दिल्ली पोलिसांना श्रद्धा वालकरची हत्या होण्यापूर्वीची ऑडिओ क्लिप मिळाली आहे. ही ऑडिओ क्लिप श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला यांच्यातील संवादाची असल्याचं सुत्रांनी सांगितलं. पोलीस महत्त्वाचा पुरावा म्हणून या क्लिपकडे बघत आहेत, कारण यातून काही गोष्टी समोर आल्या आहेत.

दिल्ली पोलिसांना मिळालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आफताब पूनावाला हा श्रद्धा वालकरसोबत भांडण करत आहे. श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला यांच्यात भांडण सुरू असल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. इतकंच नाही, तर आफताब श्रद्धा वालकरला टॉर्चर करत असल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये आहे.

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, या ऑडिओ क्लिपमुळे श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात खून करण्यामागचा उद्देश शोधण्यात मदत होईल. पोलीस या ऑडिओ क्लिपमधील आवाज आणि आफताब पूनावालाचा आवाज एकच असल्याची जुळवणी करण्यासाठी आवाजाचे नमुने घेणार आहे. सीबीआयच्या सीएफएसएल टीम आफताब पूनावालाच्या आवाजाचे नमुने घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीये.

श्रद्धा वालकरची हत्या होण्यापूर्वी दोघांमध्ये भांडण झालं होतं, असं या ऑडिओ क्लिपमुळे समोर आलंय. आफताब पूनावाला पोलिसांनी 12 नोव्हेंबर 2022 रोजी अटक केली होती. आफताबने श्रद्धाच्या खात्यातून 54 हजार रुपये ट्रान्सफर केले होते.

श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला आधी मुंबईत राहत होते. दोघे मुंबईतून दिल्लीत शिफ्ट झाले होते. दिल्लीतल्या महरौलीत फ्लॅट भाड्याने घेऊन दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. 18 मे रोजी आफताब आणि श्रद्धाचा वाद झाला. त्यानंतर आफताबने गळा दाबून श्रद्धाची हत्या केली होती. हत्येनंतर आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून जंगलात फेकले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *