तुळजापूरनंतर आता महागणपती रांजणगाव मंदिरातही ‘या’ कपड्यांवर बंदी; काय आहे कारण?

रायचंद शिंदे, प्रतिनिधी
शिरुर, 18 मे : तुळजापुर येथील श्री तुळजाभवानी मंदिर आणि मंदिराचा परिसर या ठिकाणी वेस्टर्न कपडे अर्थात पाश्चात्य कपडे घालून येणाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानने हा निर्णय घेतला आहे. या नंतर लगेचच पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिर प्रशासनाने देखील असाच निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाच्या बाबत काय भावना उमटतात हे पाहण महत्वाचं असणार आहे.
अशा भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही
तुमच्या शहरातून (पुणे)
-
स्पायडर मॅन विसरा, मुलांना द्या शिवरायांचा मावळा, पुणेकर मित्रांची अफलातून आयडिया, VIDEO
-
सत्तासंघर्षाच्या निकालानंतर ठाकरे गटाला पहिला धक्का; पुण्यातील बडा नेता शिंदे गटात
-
तुळजापूरनंतर आता महागणपती रांजणगाव मंदिरातही ‘या’ कपड्यांवर बंदी; काय आहे कारण?
-
‘शरद पवारांकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल’, भाजप कार्यकर्त्यांसमोरच असं का म्हणाले फडणवीस?
-
Pune Weather Update : पुणेकरांनो, सावधान! आज सूर्य डोक्यावर, इतकं वाढणार तापमान
-
उंची 3 फूट अन् वय 22 वर्ष, मधुमेहाचे इंजेक्शन ठेवतो मडक्यात, देवेंद्रला हवा मदतीचा हात
-
Weather Update : पुणे, मुंबई तापमान आणखी वाढणार, राज्यभरात कशी असेल स्थिती?
-
धनगर मटन, चुलीवरची LIVE भाकरी, पुण्यात या कधी पैलवान थाळी खायला, ठिकाण? पाहा हा VIDEO
-
Gold Price in Pune : लग्नसराईत आली गुड न्यूज, पाहा किती स्वस्त झालं पुण्यातील सोनं
-
‘2024 पर्यंत मोठे नेते भाजपात येणार, पुण्यातही होणार’ बदल, बावनकुळेंनी दिले स्पष्ट संकेत
-
Gold Price in Pune : पुणेकरांना आज पुन्हा दिलासा, पाहा किती स्वस्त झालं सोनं
अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिरात तोकडे कपडे घातलेले तसेच अंगप्रदर्शन करणारे, असभ्य अशोभनीय वस्त्रधारी, उत्तेजक कपडे घातलेले, हाफ पॅन्ट घातलेले, बर्मुडाधारक यांना आता मंदिरात प्रवेश नाही. वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घातलेल्यांनाही मंदिरात प्रवेश मिळणार नाही. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान राखणाऱ्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. या निर्णयाच्या बाबत काय भावना उमटतात हे पाहण महत्वाचं असणार आहे.
श्री तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्यांनाही ड्रेस कोड
श्री तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्यांना ड्रेस कोड शिवाय प्रवेश बंद करण्यात आला आहे. तरी काही पुजारी तुळजाभवानी मंदिर परिसरात जीन्स आणि शर्ट घालून फिरत असल्याचे मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आले. याप्रकरणी तुळजापूर मंदिर प्रशासनाने एक नोटीस काढली आहे. ही नोटीस मंदिर परिसरातील भितींवरती लावण्यात आल्या आहेत. यामध्ये पुजाऱ्यांनी ड्रेस कोड शिवाय मंदिरात प्रवेश करू नये अन्यथा देऊळ कवायत कायदा (निजाम कालीन कायदा) नुसार कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मंदिरातील दर्शन मंडपाच्या तिसऱ्या मजल्यावर भाविकांशिवाय पुजाऱ्यांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
त्र्यंबकेश्वर प्रवेशद्वारावर शुद्धीकरण, ग्रामसभेत एकोप्याचं दर्शन
दरम्यान भाविकांसाठी तुळजाभवानी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संस्कृती संदर्भात फलक लावण्यात आले आहेत. यामध्ये अंगप्रदर्शन करणारे व वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. या फलकांवर अंगप्रदर्शन, उत्तेजक असभ्य अशोभनीय वस्ञधारी हाफ पॅन्ट, बर्मुडाधारकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही असे म्हटलं आहे. तसेच भारतीय संस्कृती व सभ्यतेचे भान ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
HptOf767
pLYDdvPz
rsHWBO0A
kvno2FyQ
zVyrLU9C
6RpyMVVl
eW6wdS7Y
UF6sZoXU
nW8ptdru