तुनिषा शर्मा प्रेग्नेंट होती का? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य आलं समोर

मुंबई, 26 डिसेंबर : लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी अभिनेत्रीने हे टोकाचं पाऊल का उचललं असावं हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याप्रकरणी पोलीस चौकशी करत असून रोज नवनवीन अपडेट समोर येत आहे. अशातच तुनिषाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला असून यामधून काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
तुनिषाच्या मृत्यूप्रकरणी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. अशातच अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याच्याही चर्चा पहायला मिळाल्या. तुनिषा प्रेग्नेंट होती आणि शीझानने लग्नासाठी नकार दिल्यामुळे तिनं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात होतं. तुनिषाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला असून इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तुनिषा शर्मा गर्भवती नसल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच तुनिषा शर्माच्या शरीरावर जखमेच्या किंवा ओरखड्याच्या कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत.
हेही वाचा – Tunisha Sharma Death Case : तुनिषाचा मृत्यू आणि लव्ह जिहादच्या अँगलवर पोलिसांचा मोठा खुलासा, म्हणाले…
स्टमार्टम रिपोर्टेमध्ये शर्मा यांच्यासोबत बळजबरीचे कोणतेही चिन्ह नाही, असं सहाय्यक पोलिस आयुक्त चंद्रकांत जाधव स्पष्ट केलं आहे. तुनिषा शर्माचा मृत्यू 21 वर्षांच्या होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी झाला. प्राथमिक पोस्टमार्टम अहवालात तिचा मृत्यू फाशीमुळे झाल्याचे दिसून आले आहे. पोलीस अंतिम अहवालाची वाट पाहत आहेत.
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येच्या बातमीने इंडस्ट्रीतील लोक आणि तिच्या चाहत्यांना अजूनही धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या आईने तिच्या मुलीचा सहकलाकार शीझान मोहम्मद खान विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तक्रार दाखल केली. तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला असून, त्यात गुदमरणे हे तिच्या मृत्यूचे कारण असल्याचं म्हटलं आहे. एवढंच नाही तर अभिनेत्रीच्या अंत्यसंस्काराचे अपडेटही समोर आले आहे. तुनिषा शर्मा यांच्या पार्थिवावर 27 डिसेंबरला म्हणजेच उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.