तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण; लव्ह जिहादच्या अँगलने होणार तपास

- मुख्यपृष्ठ
- करमणूक  / टेलिव्हिजन
- Tunisha Sharma Case : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण; लव्ह जिहादच्या अँगलने होणार तपास, शिझानला एक दिवसाची पोलिस कोठडी
Tunisha Sharma Case : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण; लव्ह जिहादच्या अँगलने होणार तपास, शिझानला एक दिवसाची पोलिस कोठडी
Tunisha Sharma Death Case : तुनिषा आत्महत्येप्रकरणी शिझान खानला आज वसई न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Tunisha Sharma Death Case
Tunisha Sharma Death Case : तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खानला आज वसई न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता पोलीस लव जिहादच्या दृष्टीने तपास करत असल्याचं आजच्या रिमांड रिपोर्टवरुन स्पष्ट झालं आहे. तुनिषाला हिजाब घालण्यासाठी शिझान खानकडून प्रवृत्त केले जात होते. तसेच उर्दु शिकवण्यासाठीही तो तिला सांगायचा. असा जबाब तुनिषाच्या आईने पोलिसांना दिला आहे. त्या दृष्टीने तपासाला आता पुन्हा वेगळं वळण लागणार आहे.
तुनिषा आत्महत्येप्रकरणी शिझान खानला आज वसई न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाला आता लव जिहादचं वळण लागलं आहे.
वसईतीस वालीव पोलिसांनी कोर्टात शिझानची कोठडी वाढवताना शिजानने तुनिषाला सेटवर कानाखाली मारल्याचं तसेच तो तिला उर्दु शिकवत असल्याचा तसेच तिला हिजाब घालायला सांगत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिझानविरूद्ध हा जबाब कोर्टात नोंदविण्यात आला आहे. तसेच तुनिषाने आत्महत्या करण्याअगोदर काही वेळ शिझानशी बातचीत केली होती. त्यानंतर तो लगेच शूटवर गेला. तुनिषा ही शिझानच्या पाठीमागे शूटच्या गेटपर्यंत गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजवरुन दिसून आलं आहे. त्यामुळे यांच्यामध्ये यावेळी नेमकं काय बोलणं झालं याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे. शिझान खान तपासामध्ये उडवा उडवीची उत्तरं देत असल्याचं वालिव पोलासांनी कोर्टात सांगितलं आहे.
तर, दुसरीकडे शिझान खानच्या वकिलांनी लव जिहादच्या वळणाला नकार दिला आहे. शिझानची बाजू सांगताना, पोलिसांकडे कोणतेही पुरावे नसल्याचं शिझानच्या वडिलांनी म्हटलं आहे.
News Reels
तुनिषाच्या आईने पत्रकार परिषदेत केला आरोप
तुनिषा शर्माच्या आईने आज आपल्या राहत्या घरी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी तुनिषाने आत्महत्या केली नसून, तिची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. शिजानला शिक्षा व्हावी आपली इच्छा असल्याचं म्हटलं आहे. तुनिषाला हिजाब घालण्यासाठी शिझान खानकडून प्रवृत्त केले जात होते. तसेच उर्दु शिकवण्यासाठीही तो तिला सांगायचा. तिला सेटवर असताना मारहाणही शिझानने केल्याचा गंभीर आरोप तुनिषाच्या आईने आज पत्रकार परिषदेत केला आहे. तुनिषा शिझानवर तसेच त्याच्या घरच्यांवर जास्त पैसे खर्च करायची. शिझानला महागड्या वस्तू गिफ्ट द्यायची. आरोपी शिझानने तिचा फायदा घेतल्याचा आरोप तुनिषाच्या आईने केला आहे. मला टॅटू काढणे, कुत्रा पाळणे आवडत नव्हतं. तरीसुध्दा तुनिषाने शिझानसाठी स्वतःच्या शरीरावर love of everything चा टेटु सुद्धा बनवला होता. आणि कुत्रासुध्दा पाळला होता. तुनिषा ही कधीच डिप्रेशनमध्ये नव्हती. तुनिषा आत्महत्या करणारी मुलगी नव्हती ती निष्पाप मुलगी होती. शिझानने तिचा वापर केल्याचा आरोप करत, शिझान खानला कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी तुनिषाचा आईने केली आहे.