तुनिषा शर्मावर या दिवशी होणार अंत्यसंस्कार; कुटुंबीयांनी दिली मोठी माहिती

मुंबई, 25 डिसेंबर : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने सध्या सगळीकडे खळबळ माजली आहे. तिच्या आत्महत्येनंतर वेगवेगळी माहिती समोर येत आहे. तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात पोलीस एक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी टुनिषाचा सहकलाकार असलेला तिचा बॉयफ्रेंड शिझान मोहम्मद खानला ताब्यात घेतलं आहे. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. तुनिषा वर आज अंत्यसंस्कार होणार नाहीत अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यूप्रकरणी पोलिस तपास सुरू असून त्यामुळे अभिनेत्रीचे अंतिम संस्कार होऊ शकले नाहीत. आता अभिनेत्रीचे नातेवाईक पवन शर्मा यांनी माहिती दिली आहे की तुनिषा शर्मा यांच्यावर 27 डिसेंबर रोजी मीरा रोड परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हेही वाचा – Tunisha Sharma: तुनिषाच्या आत्महत्येनंतर सहकलाकाराची भावुक पोस्ट; केलं होतं बर्थ डे प्लॅनिंग
तुनिशा शर्मा मृत्यू प्रकरणात पोलिसांनी लव्ह जिहादचा अँगल पूर्णपणे नाकारला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, तुनिषाला ब्लॅकमेल करण्याचा कोणताही अँगल समोर आलेला नाही. अभिनेत्री जीशान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि 15 दिवसांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले. यामुळे तुनिशा तणावात होती, असे सांगितले जात आहे.
तुनिषा शर्माच्या निधनानंतर अभिनेत्रीचे आज अंत्यसंस्कार होणार होते, पण आता बातम्या येत आहेत की अभिनेत्रीचे अंतिम संस्कार आज म्हणजेच 25 डिसेंबर 2022 रोजी होणार नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, तुनिषाचा मृतदेह आज सकाळी कुटुंबीयांना देण्यात येणार होता आणि त्यानंतर संध्याकाळी 4 ते 4.30 या वेळेत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते, मात्र आज तिच्यावर अंतिम संस्कार होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. काल रात्री त्यांचे शवविच्छेदनही करण्यात आले असून, त्याचा अहवाल येणे बाकी आहे.
शिवाय तुनिषाच्या घरच्यांनीही शिझान खानवर आरोप केले आहेत. यावर आता पोलिसांनी केलेला खुलासा समोर आला आहे. रात्रीच तुनिषाच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम झालं आहे, त्याचा रिपोर्ट अद्याप आलेला नसला तरी पोलिसांनी हातात असलेल्या माहितीवरून तुनिषा गरोदर नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पहाटे ४ वाजेपर्यंत तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. सध्या व्हिसेरा जतन करण्यात आला आहे. त्यामुळे अद्याप याचा अहवाल समोर आलेला नाही. आज सकाळीच तुनिषाचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या सुपूर्त करण्यात येणार होता आणि आजच तिच्यावर अंतिम संस्कार पार पडणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.