तुनिषाच्या आयुष्यातले शेवटचे क्षण असे होते, CCTV फुटेज समोर, शिझानही दिसला

तुनिषाच्या-आयुष्यातले-शेवटचे-क्षण-असे-होते,-cctv-फुटेज-समोर,-शिझानही-दिसला

मुंबई, 27 डिसेंबर : लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केल्याने अनेकांना धक्का बसला. अलिबाबा दास्तान-ए-काबुल या मालिकेत तुनिषा प्रमुख भूमिकेत होती. 24 डिसेंबरला सीरियलच्या सेटवरच तुनिषाने स्वत:चं आयुष्य संपवलं. मेकअप रूममध्ये तुनिषाने पंख्याला गळफास लावून आत्महत्या करून घेतली. तुनिषाच्या आयुष्यातले शेवटचे क्षण आता समोर आले आहेत. नायगावमधलं एफ ऍण्ड बी हॉस्पिटलचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये अभिनेता शिझान खान आणि आणखी दोन माणसं तुनिषाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये शिझान खान सीरियलमधलेच कपडे घालून रुग्णालयात आल्याचं पाहायला मिळत आहे.

एफ ऍण्ड बी हॉस्पिटल सेटच्या जवळच आहे, जिकडे तुनिषा शर्मा आणि शिझान खान यांची सीरियल अली बाबा दास्तान-ए-काबुल मालिकेचं शुटिंग सुरू होतं. तुनिषाला लटकलेल्या अवस्थेत बघितल्यानंतर लगेचच रुग्णालयात आणण्यात आलं. सीसीटीव्ही मध्ये तुनिषाला उचलून एक जण पायऱ्या चढताना दिसत आहे. तर शिझान खान तसंच आणखी एक महिला त्याच्यासोबत जात आहेत, हे स्पष्ट दिसत आहे.

” isDesktop=”true” id=”806247″ >

21 वर्षांच्या तुनिषाने पालघरमध्ये सेटवरच मेकअप रूममध्ये फाशी लावून आत्महत्या केली. यानंतर मंगळवारी मुंबईच्या मीरारोडमध्ये तुनिषावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी तुनिषाचा बॉयफ्रेंड शिझान खान याला अटक करण्यात आली आहे. शिझान खानवर तुनिषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुनिषाचं आत्महत्येचा 15 दिवस आधीच शिझानसोबत ब्रेकअप झालं होतं, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

मुंबई पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमने सीरियलच्या सेटवर जाऊन तुनिषाने फाशी घेण्यासाठी वापरलेलं क्रेप बॅन्डेज आणि इतर सामान जप्त केलं आहे. यामध्ये तिचे कपडे, दागिने यांचाही समावेश आहे जे तिने शनिवारी आत्महत्या करण्याआधी घातले होते. याशिवाय पोलिसांनी तुनिषा आणि शिझान खानचा मोबाईल तसंच कपडे जप्त केले आहेत.

दुपारी 3 वाजता तुनिषा आणि शिझान खान यांनी एकत्र जेवण केलं, यानंतर 3.15 वाजता तुनिषाने आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे, त्यामुळे मधल्या 15 मिनिटांमध्ये नेमकं काय झालं, याचा तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *