तिने खूप लोकांची घरं तोडण्याचा…; श्रीजिताचे टीनावर गंभीर आरोप

तिने-खूप-लोकांची-घरं-तोडण्याचा…;-श्रीजिताचे-टीनावर-गंभीर-आरोप

मुंबई, 22 डिसेंबर : छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो म्हणजे ‘बिग बॉस’. सध्या बिग बॉस 16 चा चांगलाच धुमाकूळ पहायला मिळत असून सोशल मीडियावर याचीच चर्चा पहायला मिळतेय. बिग बॉसच्या घरात कधी मैत्री तर कधी शत्रुत्त्व पहायला मिळतं. दिवसेंदिवस शो जसा पुढे सरकतो तसतसा स्पर्धकांचा खरा चेहरा समोर यायला लागतो. अशातच घरात आल्यापासून दोन स्पर्धकांचं वैर दिसून आलं होतं. हे दोन स्पर्धक दुसरे कोणी नसून टीना दत्ता आणि श्रीजिता डे आहेत. टीना दत्ता आणि श्रीजिता डेने अनेकदा ‘बिग बॉस’च्या घरात एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला. आता पुन्हा एकदा श्रीजिताने टीनावर धक्कादायक आरोप केले आहेत.

समोर आलेल्या प्रोमो व्हिडीओमध्ये श्रीजिता डे टीना दत्तावर गंभीर आरोप करताना दिसून आली. व्हिडीओमध्ये दिसतंय की श्रीजिता आणि सौदर्या बोलत आहे. श्रीजिता सौदर्याला सांगते, ‘ती मुलांच्या अटेंशनशिवाय राहुच शकत नाही. खूप लोकांची घरं तोडण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आत्तापर्यंत स्वतःचा संसार करु नाही शकली. ती आतून एवढी दुःखी आहे की ती लोकांचे पाय खाली खेचून त्यातून आनंद घेते.’

हा प्रोमो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी श्रीजिताने केलेल्या आरोपांवर तिच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. नेटकऱ्यांचं म्हणणं आहे, जरी त्यांना टीना आवडत नसली तरी नॅशनल टेलिव्हिजनवरील मुलीच्या व्यक्तिरेखेबद्दल अशा गोष्टी बोलू नयेत. सृजिताच्या या कृतीला यूजर्स चुकीचे असल्याचं सांगत आहेत. आता टीनायाबद्दल समजल्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, टीना आणि श्रीजीता यांनी ‘उतरन’मध्ये एकत्र काम केले आहे. दोघांनी 3 वर्षे एकत्र काम केले. यानंतरही ते चांगले मित्र होते. मात्र, काही गोष्टीवरून त्यांच्यात भांडण झाले. दिवसेंदिवस दोघींमधील वाद चिघळत चाललेला पहायला मिळत आहे. आता श्रीजिता डेने टीनाला ‘हाऊस ब्रेकर’ म्हटल्यामुळे दोघींममधील कटुता आणखीनच वाढणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *