Home » ताज्या बातम्या » #IPL2022 दिल्लीसमोर 190 धावांचे लक्ष्य

#IPL2022 दिल्लीसमोर 190 धावांचे लक्ष्य

#ipl2022-दिल्लीसमोर-190-धावांचे-लक्ष्य

पुणे – ग्लेन मॅक्‍सवेल आणि दिनेश कार्तिकच्या झंझावती अर्धशतकी खेळीने बेंगळुरूने निर्धारित 20 षटकांत पाच बाद 189 धावांपर्यंत मजल मारत दिल्लीला विजयासाठी 190 धावांचे तगडे आव्हान दिले. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. बेंगळुरूचे सलामीवीर फाफ डुप्लेसिस आणि अनुज रावत यांना झटपट बाद करत गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरविला. यानंतर फलंदाजीस आलेला विराट कोहलीही 18 धावांवर धावबाद झाल्याने त्यांची 6.2 षटकांत 3 बाद 40 अशी अवस्था झाली.

या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या ग्लेन मॅक्‍सवेलने दमदार खेळी करत 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने विकेट पडत असतानाही मॅक्‍सवेलने धावगती कमी होऊ दिली नाही. पण कुलदीप यादवने त्याला झेलबाद करून दिल्लीला मोठा दिलासा मिळवून दिला. मॅक्‍सवेलने दोन चौकार आणि दोन षटकार खेचत 34 चेंडूत 55 धावा फटकाविल्या.

यानंतर दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद यांनी नाबाद 97 धावांची भागिदारी करत संघाला 189 धावांपर्यत मजल मारून दिली. कार्तिकने 34 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकार खेचत नाबाद 66 धावांची तुफानी खेळी केली. तर शाहबाज अहमद 32 धावा करून नाबाद परतला. दिल्लीकडून शार्दूल ठाकूर, खलील अहमद, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

संक्षिप्त धावफलक ः 20 षटकांत 5 बाद 189 (ग्लेन मॅक्‍सवेल 55, शाहबाज अहमद नाबाद 32, दिनेश कार्तिक नाबाद 66. शार्दुल ठाकूर 1-27, कुलदीप यादव 1-46)

Leave a Reply

Your email address will not be published.