Home » ताज्या बातम्या » खासदार हरभजन सिंगचा मोठा निर्णय ; पूर्ण पगार शेतकऱ्यांच्या मुलींना देणार

खासदार हरभजन सिंगचा मोठा निर्णय ; पूर्ण पगार शेतकऱ्यांच्या मुलींना देणार

खासदार-हरभजन-सिंगचा-मोठा-निर्णय-;-पूर्ण-पगार-शेतकऱ्यांच्या-मुलींना-देणार

नवी दिल्ली – राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेलेल्या माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. क्रिकेट जगतात मोठे नाव कमावल्यानंतर राजकारणात आलेले माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी खासदार म्हणून मिळणारे सर्व मानधन शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करणार असल्याचे जाहीर केले आहे. १६ एप्रिल रोजी त्यांनी ट्विट करुन ही माहितीआहे. तसेच देशाच्या हितासाठी शक्य ते सर्वकाही करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

As a Rajya Sabha member, I want to contribute my RS salary to the daughters of farmers for their education & welfare. I’ve joined to contribute to the betterment of our nation and will do everything I can. Jai Hind 🇮🇳🇮🇳

— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) April 16, 2022

“राज्यसभेचा खासदार म्हणून मला मिळणारे सर्व मानधन मी शेतकऱ्यांच्या मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या कल्याणासाठी देणार आहे. देशाच्या कल्याणासाठी मी राजकारणात आलो आहे. माझ्याकडून देशाच्या कल्याणासाठी जेकाही करता येईल ते सर्व करण्याचा मी प्रयत्न करणार आहे,” असे हरभजन सिंग यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हरभजन सिंग यांच्यासोबतच लव्हली प्रोफेशनल यूनिव्हर्सिटीचे संस्थापक अशोक मित्तल, आयआयटी दिल्लीचे प्रोफेसर संदीप पाठक, आपचे नेता राघव चड्ढा तसेच उद्योगपती संजीव अरोरा यांना आपने उमेदवारी दिली होती. हे सर्व उमेदवार राज्यसभेत बिनविरोध निवडून आले आहेत. याआधी आप पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीत ११७ पैकी ९२ जागांवर विजय मिळवून पंजाबमध्ये सत्ता स्थापन केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.