Home » ताज्या बातम्या » IPL: तेवातियाची थरारक बॅटिंग, शेवटच्या 2 बॉलला सिक्स ठोकत गुजरातचा सनसनाटी विजय

IPL: तेवातियाची थरारक बॅटिंग, शेवटच्या 2 बॉलला सिक्स ठोकत गुजरातचा सनसनाटी विजय

ipl:-तेवातियाची-थरारक-बॅटिंग,-शेवटच्या-2-बॉलला-सिक्स-ठोकत-गुजरातचा-सनसनाटी-विजय

मुंबई, 8 एप्रिल : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) मोसमातली पहिलीच रोमांचक मॅच गुजरात आणि पंजाब किंग्स (Gujarat Titans vs Punjab Kings) यांच्यात झाली आहे. शेवटच्या 2 बॉलला 12 रनची गरज असताना राहुल तेवातियाने (Rahul Tewatia) ओडियन स्मिथला 2 सिक्स मारत गुजरातला सनसनाटी विजय मिळवून दिला. आयपीएलच्या या मोसमात गुजरातने अजूनपर्यंत एकही मॅच गमावलेली नाही. 3 सामन्यांमध्ये त्यांच्या खात्यात 3 विजय आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये गुजरातची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्सने दिलेल्या 190 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा ओपनर शुभमन गिलने 59 बॉलमध्ये 96 रनची खेळी केली. गिलच्या या खेळीमध्ये 11 फोर आणि 1 सिक्सचा समावेश होता. याशिवाय आपली पहिलीच मॅच खेळणाऱ्या साई सुदर्शनने 35 आणि हार्दिक पांड्याने 27 रन केले. राहुल तेवातियाने 3 बॉलमध्ये नाबाद 13 रन करत गुजरातला रोमांचक विजय मिळवून दिला. पंजाबकडून रबाडाला 2 आणि राहुल चहरला 1 विकेट मिळाली. पंजाबविरुद्धच्या या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर पंजाबने 20 ओव्हरमध्ये 189/9 पर्यंत मजल मारली. लियाम लिव्हिंगस्टोनने 27 बॉलमध्ये 64 रनची खेळी केली, यामध्ये 4 सिक्स आणि 7 फोरचा समावेश होता. याशिवाय शिखर धवनने 35 आणि जितेश शर्माने 23 रन केले. नवव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या राहुल चहरने 14 बॉलमध्ये नाबाद 22 रन केले. गुजरातकडून राशिद खानला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या, तर दर्शन नालकंडेला 2 विकेट घेण्यात यश आलं. मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या आणि लॉकी फर्ग्युसनने 1-1 विकेट घेतली.

Published by:Shreyas

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Punjab kings

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed