Home » ताज्या बातम्या » #IPL2022 #LSGvDC | क्विंटन डी कॉकने मोडला सचिनचा विक्रम

#IPL2022 #LSGvDC | क्विंटन डी कॉकने मोडला सचिनचा विक्रम

#ipl2022-#lsgvdc-|-क्विंटन-डी-कॉकने-मोडला-सचिनचा-विक्रम

मुंबई : आयपीएल मध्ये शुक्रवारी लखनौ सुपर जायंट्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी झाला. या सामन्यात लखनौचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने इतिहास रचला आहे. त्याने आयपीएलमधील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला आहे.

क्विंटन डी कॉक आता आयपीएलमध्ये सचिनपेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज बनला आहे. सचिनने आयपीएल कारकिर्दीत 78 सामने खेळताना 2 हजार 334 धावा केल्या होत्या. शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स विरूध्द झालेल्या सामन्यात 9 धावा करत त्याने सचिनला मागे टाकले आहे. या सामन्यापूर्वी क्विंटन डी कॉकच्या नावे 2,325 धावा होत्या.  क्विंटन डी कॉकच्या नावे आता 81 सामन्यात 2 हजार 405 धावा आहेत.

क्विंटन डी कॉक याने दिल्ली कॅपिटल्स विरूध्दच्या सामन्यात सचिनचा विक्रम तर मोडित काढला त्याचबरोबर 52 चेंडूत 80 धावांची खेळी करत संघास विजय प्राप्त करून दिला . या खेळीत त्याने 9 चौकार व 2 षटकार लगावले.

दरम्यान, आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत 207 सामने खेळताना 6 हजार 283 धावा केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.