Home » ताज्या बातम्या » राष्ट्रवादीत प्रवेश करताच आसावरी जोशींचा महागाईवरून भाजपाला टोला, म्हणाल्या “जीवनावश्यक वस्तू…”

राष्ट्रवादीत प्रवेश करताच आसावरी जोशींचा महागाईवरून भाजपाला टोला, म्हणाल्या “जीवनावश्यक वस्तू…”

राष्ट्रवादीत-प्रवेश-करताच-आसावरी-जोशींचा-महागाईवरून-भाजपाला-टोला,-म्हणाल्या-“जीवनावश्यक-वस्तू…”

मुंबई – मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून ‘आसावरी जोशी’ ओळखल्या जातात. मात्र, अभिनय क्षेत्रात कामगिरी बजविल्यानंतर ‘आसावरी जोशी’ यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.  मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘आसावरी जोशी’ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे अन्य नेते आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

आसावरी जोशी म्हणाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित मी प्रवेश केला. त्यांचे मी मनापासून आभार मानते. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, चित्रपट आणि संस्कृतिक विभाग या पदी माझी निवड झालेली आहे. कलाकारांचे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी निश्‍चित करेन, असे त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आसावरी जोशींनी भाजपला खोचक टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या,’मी सर्वात आधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देते. तुम्हा सर्वांना हे वर्ष आनंदाचे, सुख समाधानाचे, भरभराटीचे, आरोग्यदायी आणि जीवनावश्यक वस्तू योग्य दरात मिळण्याचे जाऊ दे, अशी अपेक्षा व्यक्त करते.”असं म्हणत महागाईच्या मुद्यावरून त्यांनी भाजप सरकारला टोला लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.