Russia-Ukraine युद्धातून भारताला मोठी संधी, रशियात या भारतीय वस्तूंना मागणी

एप्रिल 2020 ते मार्च 2021 मध्ये, भारत आणि रशियामधील एकूण व्यापार $ 8.1 अब्ज होता. यात भारतातून रशियाला $ 2.6 अब्ज निर्यात होत होतं. तर, रशियाकडून होणारी आयात $ 5.48 अब्ज होती. मात्र, सध्याच्या संधीतून भारतातून रशियाला होणाऱ्या निर्यातीचा आकडा झपाट्यानं वाढू शकतो.
पुढे वाचा …
- Maharashtra Maza News
- Last Updated :
नवी दिल्ली, 1 एप्रिल : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia-Ukraine War) आणि जगातील अनेक देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादल्यामुळं आता रशियामध्ये भारतीय वस्तूंची मागणी झपाट्यानं वाढली आहे. अशा परिस्थितीत भारतासाठी रशियामध्ये आपल्या विविध उत्पादनांची विक्री करण्याची ही मोठी संधी आहे. आतापर्यंत अमेरिका, इंग्लंड आणि युरोपीय देशांकडून रशियाला वाढीव प्रमाणात माल पाठवला जात होता. मात्र, रशियावर निर्बंध असल्यानं आता कोणताही देश रशियाला माल पाठवत नाही. अशा परिस्थितीत, रशियातील अनेक व्यावसायिक संस्थांनी भारतीय मालासाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (Cait) कडे संपर्क साधला आहे, तर भारतातील व्यापारी देखील भारतीय उत्पादनं रशियाला निर्यात करण्यास उत्सुक आहेत. Cait चे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितलं की, रशियामध्ये भारतीय उत्पादनांची मागणी खूप वेगानं वाढली आहे आणि पहिल्या टप्प्यात फ्रूट जॅम आणि जेली, कॉर्नफ्लेक्स, म्यूस्ली, चहा, कॉफी पावडर, साखर, मीठ आणि मिरपूड पाउच, दूध पावडर, फळं, भाज्या, चीज, पास्ता, लोणी, फ्रूट ड्रिंक्स, सूपच्या वस्तू, मसाले, मध, बिस्किटे, लोणचे, फ्रोझन स्नॅक्स, अन्नधान्य, केचअप, ओट्स, रेडीमेड अन्न, ब्रेड, विविध पदार्थांची तातडीची गरज आहे. तांदूळ, बीन्स, कॉर्नफ्लोर पावडर, सूप स्टिक्स, बटाटा चिप्स आदी पॅकिंग केलेल्या वस्तूंची मागणी वाढली आहे. एप्रिल 2020 ते मार्च 2021 मध्ये, भारत आणि रशियामधील एकूण व्यापार $ 8.1 अब्ज होता, ज्यामध्ये भारतातून रशियाला $ 2.6 अब्ज निर्यात होत होतं. तर, रशियाकडून होणारी आयात $ 5.48 अब्ज होती. मात्र, सध्याच्या संधीतून भारतातून रशियाला होणाऱ्या निर्यातीचा आकडा झपाट्यानं वाढू शकतो. भरतिया आणि खंडेलवाल यांनी सांगितलं की, रशियानं आपल्या काही निवडक बँकांना रशियामध्ये आयात केलेल्या मालाचे पैसे भरण्यासाठी विशेष अधिकृत केलं आहे आणि सर्व वस्तूंचे पैसे डॉलरऐवजी रशियन चलन रूबलमधून दिले जातील. भारतीय उत्पादनांसाठी रशियन बाजारपेठेत प्रवेश करण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. Cait या बाबतीत भारतीय उत्पादक आणि व्यापारी आणि रशियन व्यापारी यांच्यात समन्वयक म्हणून काम करेल. दोन्ही व्यावसायिक नेत्यांनी सांगितलं की, अशी माहिती आहे की, रशिया आणि भारतानं SWIFT सारख्या पेमेंट प्लॅटफॉर्मवर आपला कार्यक्रम पूर्ण केला आहे. ही नवीन पेमेंट सिस्टम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयात आणि रशियाचे विकास महामंडळ असलेल्या रशियाच्या VEB मध्ये स्थापित केली जाईल. ही नवीन पेमेंट प्रणाली येत्या एक आठवडा ते दहा दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आयात-निर्यात दस्तऐवज आणि रुपये आणि रूबलमध्ये सेटलमेंट करणं शक्य होईल. भरतिया आणि खंडेलवाल म्हणाले की, या विषयावर कॅटनं देशातील सर्व राज्यांच्या विभागांना रशियाकडून प्राप्त झालेल्या या पहिल्या यादीवर काम करण्याचं आवाहन केलं आहे. जेणेकरून, अधिकाधिक भारतीय उत्पादक आणि व्यापारी याचा लाभ घेऊ शकतील आणि त्यांची उत्पादनं मोठ्या प्रमाणात रशियामध्ये आणू शकतील. त्यांनी असंही सांगितलं की, Cait नं रशियातील आपल्या संपर्कांना देखील सांगितलं आहे की, भारतातील इतर उत्पादनं जसं की, पादत्राणं, खेळणी, तयार कपडे, कपडे, इतर अन्नधान्य, बिल्डर हार्डवेअर, कागद आणि स्टेशनरी, संगणक आणि संगणकासाठी लागणारी इतर उपकरणं, चष्मे, सायकली आणि सायकलचे सुटे भाग, ऑटो पार्ट्स यांच्या मागणीबद्दल माहिती मागवली आहे.
Published by:Digital Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business, Russia Ukraine