Home » ताज्या बातम्या » पती-पत्नीच्या आत्महत्येने खळबळ; तीन वर्षांपूर्वी झाला होता विवाह

पती-पत्नीच्या आत्महत्येने खळबळ; तीन वर्षांपूर्वी झाला होता विवाह

पती-पत्नीच्या-आत्महत्येने-खळबळ;-तीन-वर्षांपूर्वी-झाला-होता-विवाह

परभणी – जिल्ह्यातील सेलु येथे पती-पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील राजीव गांधी नगर येथे ही घटना घडली. पती अर्जुन गणेश आवटे (वय 32) आणि पत्नी प्रियंका अर्जुन आवटे (वय 28) अशी दोघांची नावे आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राजीव गांधी नगर येथील राहत्या घरी अर्जुन आवटे यांनी लोखंडी आडूला नायलाॅनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. तर प्रियंका यांचा मृतदेह पलंगावर झोपलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

आवटे दाम्पत्य रविवारी एका खोलीत झोपले होते. सकाळी सात वाजले तरी दोघेही घराबाहेर येत नसल्याने अर्जुन यांच्या बहीणीने घराचा दरवाजा वाजवला मात्र आतून काहीही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर तिने वडिलांना याबाबत सांगितले असता त्यांना दरवाजा तोडताच आतमध्ये दोघांचे मृतदेह आढळले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे. दरम्यान, प्रियंका यांचा मृतदेह पलंगावर आढळल्याने अगोदर प्रियंकाची हत्या करून नंतर अर्जुन याने गळफास लावला असेल का? याचा तपास पोलिस करत आहे.

अर्जुनचा तीन वर्षांपूर्वी प्रियंकाशी विवाह झाला होता. अर्जुन शहरात ऑटोरिक्षा चालवून उपजीविका भागवत असे. दोघाच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.