Home » ताज्या बातम्या » Gudi Padwa 2022 : गुढी कशी उभारावी? कसा साजरा करावा गुढीपाडवा; जाणून घ्या शास्त्रोक्त माहिती…

Gudi Padwa 2022 : गुढी कशी उभारावी? कसा साजरा करावा गुढीपाडवा; जाणून घ्या शास्त्रोक्त माहिती…

gudi-padwa-2022-:-गुढी-कशी-उभारावी?-कसा-साजरा-करावा-गुढीपाडवा;-जाणून-घ्या-शास्त्रोक्त-माहिती…

पुणे – गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. यंदाचा गुढीपाडवा २ एप्रिल २०२२ रोजी आहे.  या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात.

दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. या सणाच्या दिवशी सर्वत्र आनंदाचे आणि मांगल्याचे वातावरण असते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. या दिवशी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जातात.

गुढी कशी उभारावी….

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठून घराची स्वच्छता करावी. अंगास सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करावे. दरवाजासमोर रांगोळी काढावी. नवीन वस्त्रे परिधान करावी. देवाची पूजा करावी.. आणि नंतरच गुढी उभारण्यास सुरुवात करावी. दरम्यान, सर्वात आधी गुढी उभारताना वेळूची (बांबूची ) एक काठी घेऊन , ती स्वच्छ धुवून तिला चंदन, हळद-कुंकू लावावे.

तिच्या टोकास रेशमी (तांबडे) वस्त्र, फुलांची माळ, कडुलिंबाची पाने व साखर माळ घालून त्यावर एक लोटी किंवा तांब्याचे स्वच्छ भांडे ठेवावे. अशा रितीने तयार केलेली गुढी दारासमोर रांगोळी घालून त्यावर उभी करावी. या गुढीस ‘ब्रह्मध्वज‘ असे म्हणतात. प्रार्थना करत गुढीची पूजा करावी. आणि सर्वांनी नमस्कार करावा…

Leave a Reply

Your email address will not be published.