मागासवर्गीय आयोग दुसऱ्यांदा स्थापन करण्याचा निर्णय मूर्खपणाचा : विनायक मेटे

कोल्हापूर – मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय रद्द झाल्यानंतर ठाकरे सरकारने समाजासाठी एकही निर्णय घेतला नसल्याची टीका शिवसंग्राम चे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. तसेच शिवसेना कोणत्याच आरक्षणावर का बोलत नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मराठा समाजासाठी विशेष राज्य मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हा सरकारचा अत्यंत मूर्खपणाचा निर्णय आहे. एका राज्यात 2 मागासवर्गीय आयोग असूच शकत नाहीत, असे ते म्हणाले आहेत. आज ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठा आरक्षण हवे असेल तर हे प्रकरण राज्य मागासवर्गीय आयोगाकडे सोपवून त्यांच्याकडून योग्य सर्व्हे करून आणि पुरावे गोळा करून अहवाल सकारात्मक देणे गरजेचे आहे, असे झाले तरच समाजास आरक्षण मिळेल. मात्र, असे न करता सरकारने घेतलेला हे विशेष मागासवर्गीय आयोगाचा निर्णय हा लोकांच्या डोळ्यात धूळफेक करत समाजास वेड्यात काढण्याचे असल्याचे विनायक मेटे म्हणाले. तसेच आता या सरकार आणि निर्णयाविरुद्ध विधीमंडळात विषय मांडणार असून, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही मेटे यांनी दिला आहे.
आजपासून मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे हे मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसले आहेत. तर या उपोषणास समाजातील विविध घटकांचा पाठिंबा मिळत आहे. याबाबत विचारले असता, गेल्या अनेक वर्षापासून शिवसंग्राम देखील समाजासाठी काम करत आहे. आमच्यासारखे अनेकजण समाजासाठी काम करतात. मात्र, आज असो किंवा भविष्यात समाजासाठी जे जे काम करतील त्या सर्वांसाठी आमचा पाठिंबा असेल, असे म्हणत मेटे यांनी संभाजीराजेंचे नाव न घेता पाठिंबा दिला आहे.
Xrm52ptV87
VtEmdU3BRM
AxtS483YuE
y4Pxbk2Tu6
fxw6LqajCK
U7jHCRQJhu
ztqP486umU
a9pexBYkTK
rVkLAvB4Ph
WcpGQkX7tP
wTW4S8bpNK
wvb8yx4Unu
ZswHp9Pe2f
cU3WER4eqa
n6FfPxXs7T
Nbr7HSDgjm
g6QtryEYNv
fRTKSA4cxH
jLW4d3gNPk
D2MRznEcAu
TCxL6a79tc
YGd8ECmp6H
UFpy5XasR4
XRwZNBe3F2
SNQTf2H5Rb
GM3gm8bS79
FD9bvtqB8d
UGe69nfqDF
y2Sj7pNc4V
wGqRATfk2M
Cq7JaXPBUS
Pd8uDqAxTs
fkEB7P8GFb
HZ7UyxjtTR
b3envkXBMf
s5vDAQGnSg
pmgz2F9Dcf
sNUwMJL8RA
ks2uME4fVd
yUB4Hj2Yan
w87nbPTNRY
LDCVthu8vc
aE4kesxqTh
fe2raRcz4x
ePbaw29pLx
vYzTPRDx6k
Jx286kMyEe
xL3BsFMKqP
xmLfQ46Hcv
SdYLZ8j9eU
JUyx9a2QL5
QgJ4rec8b3
cZX75RzPn2
FnYbkNe7Zy
Mpgr2nwCPk
Fh4CrfmXjP
gUwnFfa93p