Home » ताज्या बातम्या » भारताच्या पराभवाने दीपक चहर खचला; ड्रेसिंगरुममध्ये दिसला रडताना

भारताच्या पराभवाने दीपक चहर खचला; ड्रेसिंगरुममध्ये दिसला रडताना

भारताच्या-पराभवाने-दीपक-चहर-खचला;-ड्रेसिंगरुममध्ये-दिसला-रडताना

केपटाऊन  – भारतीय संघाला विजय मिळून देण्यासाठी अथक मेहनत घेत असलेल्या दीपक चहरला तो बाद झाल्यावर संघाचा झालेला पराभव सहन झाला नाही. ड्रेसिंगरुममध्ये बसून तो चक्क रडताना दिसला. त्याने अर्धशतकी खेळी केली मात्र, तो बाद झाल्यावर संघाला अवघ्या चार धावांनी पराभव पत्करावा लागला व ही मालिकाही 3-0 अशी गमवावी लागली.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिलाच सामना खेळणाऱ्या दीपक चहरने कारकीर्दीतील दुसरे अर्धशतक फटकावताना सामना भारतीय संघाच्या बाजूने झुकवला. मात्र, तो बाद झाल्यावर नंतरच्या फलंदाजांनी हाराकीरी केली व संघाचा पराभवा स्वीकारावा लागला. सामना संपल्यानंतर चहर अत्यंत निराश झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे दुश्‍य कॅमेऱ्याने टिपले.

चहर बाद झाला नसता, तर सामना भारताने जिंकला असता. अशाच अटीतटीच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात चहरने 82 चेंडूत 69 धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली होती. या वेळी मात्र तो त्या कामगिरीची पुनरावृत्ती करु शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.