Home » ताज्या बातम्या » मायावतींनी जाहीर केली 51 उमेदवारांची यादी

मायावतींनी जाहीर केली 51 उमेदवारांची यादी

मायावतींनी-जाहीर-केली-51-उमेदवारांची-यादी

लखनौ – बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी दुसऱ्या टप्प्यासाठी 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर करतानाच मायावती यांनी हर पोलिंग बूथ को जिताना है बसपा को सत्ता में लाना है हा नारा दिला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील जनता मायावतींना साथ देणार का, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

मायावती यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दुसऱ्या टप्प्यातील 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या टप्प्यात 55 जागांवर निवडणुका होत आहेत. त्यापैकी 51 जागांची ही यादी जाहीर करण्यात आली आहे. इतर चार उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार असल्याचं मायावती यांनी सांगितलं. मायावती यांनी यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

बसपाने निवडणूक प्रचार सुरू न केल्याबद्दल कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सवाल केले होते. त्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही निवडणूक प्रचार सुरू केला आहे. उमेदवारांच्या याद्याही जाहीर केल्या आहेत, असं मायावती म्हणाल्या.

1 thought on “मायावतींनी जाहीर केली 51 उमेदवारांची यादी

Leave a Reply

Your email address will not be published.