Home » Uncategorized » उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे खंडणी मागणाऱ्या सहा जणांना पोलीस कोठडी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे खंडणी मागणाऱ्या सहा जणांना पोलीस कोठडी

उपमुख्यमंत्री-अजित-पवार-यांच्या-नावे-खंडणी-मागणाऱ्या-सहा-जणांना-पोलीस-कोठडी

पुणे : गुगल प्ले स्टोअरमधून फेक कॉल ऍप डाऊनलोड करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे लाखांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना 17 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अशा प्रकारचे गुन्हे आरोपींनी यापूर्वी केले आहेत का, याच शोध घेण्यासाठी, तसेच आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. त्यांचे तांत्रिक विश्‍लेषण करण्यासाठी सर्वांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

नवनाथ भाऊसाहेब चोरामले (वय 28, रा. शिरसवाडी, वाडेबोल्हाई, ता. हवेली), सौरभ नारायण काकडे (वय 20, रा. हडपसर), सुनील गौतम वाघमारे (वय 28, रा. तारमळा रस्ता, थेऊर, ता. हवेली), किरण रामभाऊ काकडे (वय 25, रा. दत्तनगर, थेऊर, ता. हवेली), चैतन्य राजेंद्र वाघमारे (वय 19, रा. फुरसुंगी), आकाश शरद निकाळजे (वय 24, रा. शिरसवाडी, वाडेबोल्हाई, ता. हवेली) अशी सहा जणांची नावे आहेत.

त्यापैकी सौरभ काकडे याच्या वतीने न्यायालयात ऍड. सुधीर शहा आणि ऍड. राहुल भरेकर यांनी काम पाहिले. याबाबत शहरातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाने गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *