Home » ताज्या बातम्या » अयोध्या ना मथुरा; योगी अदित्यनाथ गोरखपुरातूनच लढणार

अयोध्या ना मथुरा; योगी अदित्यनाथ गोरखपुरातूनच लढणार

अयोध्या-ना-मथुरा;-योगी-अदित्यनाथ-गोरखपुरातूनच-लढणार

लखनौ  – हिंदुत्वाच्या नावावरील व्होट बॅंक मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना अयोध्येतून उमेदवारी देण्याचे भाजपने योजले होते. पण तो बेत बारगळला असून योगी अदित्यनाथ हे अयोध्येतून नव्हे तर ते आपल्या गोरखपुरच्या बालेकिल्ल्यातूनच लढणार आहेत.

त्यांना पक्षाने गोरखपुर शहर मतदार संघातून उमेदवारी घोषित केली आहे. गोरखपुर लोकसभा मतदार संघातून ते सलग पाच वेळा विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या बालेकिल्ल्यातून निवडणूक लढवणे तुलनेने सोपे जाणार आहे.

योगींच्या मतदार संघाविषयी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये बरीच चर्चा झाली शेवटी त्यांना त्यांच्या नेहमीच्याच मतदार संघातून उमेदवारी देण्याचा निर्णय झाला अशी माहिती केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.

पुर्व उत्तरप्रदेशातील भाजपच्या तीन मंत्र्यांनी आणि दहा आमदारांनी पक्ष सोडल्याने त्या भागातील भाजपची स्थिती सध्या नाजूक झाल्याने योगींना तेथे रिंगणात उतरवण्याचा पक्ष श्रेष्टींचा इरादा होता. तथापि योगींच्या व्यक्तीगत इच्छेला मान देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed