अजब सल्ला..! चक्क IIT संचालकांनी दिला भूत पळवण्याचा मंत्र

IIT मंडीचे (IIT Mandi,) संचालक म्हणून नियुक्त झालेले लक्ष्मीधर बेहरा यांचा व्हिडिओ समोर आला आहे. आम्ही पवित्र मंत्रांच्या जपाद्वारे आमच्या मित्राच्या अपार्टमेंटमधून आणि पालकांमधून वाईट आत्म्यांना पळवून लावलं, असं ते व्हिडिओ बोलताना दिसत आहेत.
पुढे वाचा …
- Maharashtra Maza News
- Last Updated :
उत्तर प्रदेश, 15 जानेवारी: IIT कानपूरचे (IIT Kanpur) प्राध्यापक आणि अलीकडेच IIT मंडीचे (IIT Mandi,) संचालक म्हणून नियुक्त झालेले लक्ष्मीधर बेहरा यांचा व्हिडिओ समोर आला आहे. आम्ही पवित्र मंत्रांच्या जपाद्वारे आमच्या मित्राच्या अपार्टमेंटमधून आणि पालकांमधून वाईट आत्म्यांना पळवून लावलं, असं ते व्हिडिओ बोलताना दिसत आहेत. IIT कानपूरच्या वेबसाइटनुसार, लक्ष्मीधर बेहरा हे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागात प्राध्यापक आहेत. त्यांनी आयआयटी दिल्लीतून पीएचडी आणि जर्मन नॅशनल सेंटर फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून पोस्ट-डॉक पदवी घेतली आहे. तसंच रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये तज्ज्ञ मानले जातात. हेही वाचा- बस चालकाला फिट येताच महिलेनं घेतलं स्टिअरिंग हाती; प्रसंगावधान राखत वाचवला चालकाचा जीव, VIDEO व्हायरल 2020 मध्ये कोरोना लॉकडाऊन दरम्यान, त्यांनी त्यांच्या परिसरात एक कम्युनिटी किचन चालवले, ज्याद्वारे त्यांनी दररोज 800 हून अधिक रस्त्यावरील मुलांना जेवण दिले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही एक ट्विट करून त्यांच्या कामाचे कौतुक केलं होतं. पाच मिनिटांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये, लक्ष्मीधर बेहरा आपल्या एका संकटात असलेल्या मित्राला मदत करण्यासाठी 1993 मध्ये चेन्नईला कसे गेले होते त्याची आठवण करुन देत आहेत. ज्या मित्राचं कुटुंब भुतांनी पछाडलेलं होतं. ‘हरे रामा हरे कृष्ण’ या मंत्राचा जप करण्याबरोबरच त्यांनी “भगवद्गीतेत वर्णन केलेल्या विचारांचा आणि ज्ञानाचा सराव करण्यास सुरुवात केली होती” असे देखील व्हिडिओत बोलताना मिळतंय. मी माझ्या मित्राला पवित्र शक्तीबद्दल सांगायचे ठरवले होते, असंही ते म्हणताहेत. पुढे बेहरा व्हिडिओमध्ये म्हणतात की, मी माझ्या दोन मित्रांसह संध्याकाळी 7 वाजता पोहोचलो. मित्र एका रिसर्च स्कॉलर अपार्टमेंटमध्ये राहत होता. 10-15 मिनिटांच्या जोरात मंत्रोच्चारानंतर अचानक आम्हाला त्यांचे वडील दिसले, जे खूप लहान होते, खूप म्हातारे आणि जेमतेम चालू शकत होते पण अचानक त्यांचे हात आणि पाय… आणि ते भयंकर पद्धतीनं नाचू लागले आणि त्यांचे डोकं छताला लागले. त्यांना वाईट आत्म्याने पूर्णपणे पछाडलेले होते. बेहरा पुढे सांगतात की, त्यांच्या मित्राची आई आणि पत्नीलाही वाईट आत्म्याने पछाडले होते. मात्र 45 मिनिटे ते एक तास नामजप झाल्यानंतर वाईट आत्मा तेथून पळून गेली. व्हिडिओबद्दल विचारले असता, लक्ष्मीधर बेहरा यांनी शुक्रवारी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, मी जे केले ते मी सांगितले. होय भुतं असतात. आधुनिक विज्ञान अनेक घटनांचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. हा व्हिडिओ सात महिन्यांपूर्वी यूट्यूबच्या गीता लाइव्ह गीता पेजवर अपलोड करण्यात आला होता. दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसने व्हिडिओबद्दल विचारल्यानंतर व्हिडिओची सेटिंग सार्वजनिक ते खाजगीमध्ये बदलण्यात आली. हेही वाचा- IPL 2022 : CSK चा कॅप्टन या सिझनमध्येच बदलणार, 3 वेळा विजेतेपद पटकावणारा घेणार धोनीची जागा! IIT च्या एका प्राध्यापकाने सांगितलं की, बेहरा हे अतिशय धार्मिक व्यक्ती आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. IIT मंडीचे संचालक म्हणून लक्ष्मीधर बेहरा, IIT हैदराबादचे अध्यक्ष BVR मोहन रेड्डी, भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन, IIT मंडीचे अध्यक्ष प्रेम व्रत, IIT कौन्सिलचे अध्यक्ष के राधाकृष्णन, तत्कालीन उच्च शिक्षण सचिव अमित खरे आणि शिक्षण मंत्र्यांच्या समितीद्वारे यांची निवड करण्यात आली. बेहरा यांची नियुक्ती करणाऱ्या समितीच्या सदस्याने सांगितले की, ते मुख्य दावेदार होते मात्र मुलाखतीदरम्यान व्हिडिओबद्दल त्यांना माहिती नव्हती.
Published by:Maharashtra Maza News
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IIT