Home » ताज्या बातम्या » माणिका बत्रा हिची महिला एकेरी टेबल टेनिसच्या तिसऱ्या फेरीत धडक

माणिका बत्रा हिची महिला एकेरी टेबल टेनिसच्या तिसऱ्या फेरीत धडक

माणिका-बत्रा-हिची-महिला-एकेरी-टेबल-टेनिसच्या-तिसऱ्या-फेरीत-धडक

टोक्‍यो – येथे सुरु असलेल्या टोक्‍यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या माणिका बत्राने महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली आहे. तिने युक्रेनच्या मार्गारिटा रेसोस्काला पराभूत करताना 4-3 अशी उत्तम कामगिरी नोंदवली.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात मार्गारिटाने आपल्या आक्रमक खेळाने सुरुवात केली होती. पहिले दोन गेम्स तिने 11-4, 11-4 असे जिंकले. मग मात्र माणिकाने जोरदार आक्रमण करत 11-7, 12-10 अशी कामगिरी नोंदवत 2-2 अशी बरोबरी साधली.

पुन्हा मार्गारिटाने 11-8 कामगिरी नोंदवत पुन्हा आघाडी घेतली पण बात्राने लगेचच 11-5 गुण घेत पुन्हा बरोबरी साधली. ही आघाडी काय्म ठेवत अखेरच्या गेममध्ये बात्राने 11-7 असे गुण घेत विजय मिळवला आणि तिने दिमाखात तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

रविवार सकाळ पी. व्ही. सिंधूच्या बॅडमिंटनमधील यशाने सुरु झाली. मात्र नंतर सानिया मिर्झा आणि अंकिता रैनाच्या टेनिसमधील पराभवाने निराशेची छाया भारतीय गोटात पसरली. मात्र माणिका बत्राने स्पर्धेत भारताचे नाव रोशन करण्याच्या दृष्टीने आपली वाटचाल पुढे सुरु ठेवली.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed