Home » Uncategorized » नव्या वादाची ठिणगी भाजप नेते म्हणाले,’भाजपलाही उदयनराजे नकोसे?’

नव्या वादाची ठिणगी भाजप नेते म्हणाले,’भाजपलाही उदयनराजे नकोसे?’

नव्या-वादाची-ठिणगी-भाजप-नेते-म्हणाले,’भाजपलाही-उदयनराजे-नकोसे?’

सातारा – नगरपंचायत निवडणुकांच्या निमित्तानं पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी व फलटण तालुका संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी चंद्रकांत पाटील मंगळवारी सातारा दौऱ्यावर होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली की,’ममता बनर्जी मुंबईमध्ये आल्या की त्यांच्या सुरात सुर मिसळतात. दिल्लीत गेले की राहुल गांधी यांच्या सुरात सुर मिसळतात. संजय राऊत हे एक नंबरची डबल ढोलकी आहेत. अशी टीका पाटील यांनी केली आहे.’ 

 या कार्यक्रमाला खा. रणजीत सिंह नाईक निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, समाधान अवताडे, सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर यांच भाषण झालं, त्यांनी  साताऱ्याच्या भावी खासदाराबद्दल त्यांनी विधान केलं. माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हे पुढच्या वेळी साताऱ्याचे खासदार व्हावेत. अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली. पावसकर यांचं हे विधान अनेकार्थांनी महत्त्वाचं मानलं जात आहे.’त्यांच्या या विधावरून  राजकारण चांगले तापले आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *