Home » Uncategorized » 35 वर्षीय महिलेसोबत 67 वयाच्या पतीचे अनैसर्गिक कृत्य; महिलेच्या अंगभर जखमा

35 वर्षीय महिलेसोबत 67 वयाच्या पतीचे अनैसर्गिक कृत्य; महिलेच्या अंगभर जखमा

35-वर्षीय-महिलेसोबत-67-वयाच्या-पतीचे-अनैसर्गिक-कृत्य;-महिलेच्या-अंगभर-जखमा

प्रातिनिधीक फोटो

तीन महिने सुरू असलेल्या छळानंतर शेवटी महिलेने या प्रकरणात पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  इंदूर, 8 डिसेंबर : मंगळवारी जनसुनावणीदरम्यान एका 35 वर्षीय महिलेने 67 वर्षीय गिरीश कुमार सोनी यांच्यावर फसवणूक आणि अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप केला आहे. महिलेने सांगितलं की, गिरीशने खोटं बोलून महिलेसोबत आर्य समाजमध्ये लग्न केलं आणि तिचं शारिरीक शोषण केलं. पीडितेने गिरीश यांच्यावर खोट्या दातांनी शरीरावर ठिकठिकाणी चावल्यामुळे जखमी केल्याचाही आरोप केला आहे. महिला पोलीस ज्योती शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिचोली येथील निवासी 35 वर्षीय महिलेने 67 वर्षीय गिरीश यांच्यासोबत लग्न केलं होतं. आर्य समाजातील संबंधित एका व्यक्तीच्या माध्यमातून तब्बल 3 महिन्यांपूर्वी दाहोद निवासी गिरीश याच्यासोबत भेट झाली होती. 28 ऑक्टोबर रोजी दोघांनी भागीरथपूर येथील आर्य मंदिरात लग्न केलं होतं. लग्नानंतर 67 वर्षीय गिरीश महिलेला शारिरीक त्रास देत होता, तो महिलेसोबत अनैसर्गिक कृत्य करीत असल्याचाही आरोप केला आहे. वृद्धावस्थेमुळे त्यांना दात नव्हते. यामुळे तो खोटे दात लावत होता. आरोपीने महिलेला शरीरावर ठिकठिकाणी चावा घेतला होता, यामुळे महिलेच्या शरीरभर जखमा झाल्या होत्या. इतकच नाही तर आरोपी महिलेला मानसिक आणि शारीरिक छळही करीत होता. महिलेने असंही सांगितलं की, लग्नाच्या पूर्वी त्यांनी एक अट ठेवली होती, त्यानुसार 15 दिवस इंदूर आणि 15 दिवस गुजरातमध्ये राहावं लागेल. मात्र त्यांनी एकत्र राहण्यास नकार दिला. आता ते खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत आहे. पोलिसांनी पीडितेचं मेडिकल चेकअप केलं, आणि रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. हे ही वाचा-पत्नीच्या यशाची पतीला मोजावी लागली किंमत; भररस्त्यात 7 गोळ्या घालून हत्या हुंड्यासाठी मागितली कार आणि बाईक… ओम विहार कॉलनी निवारी टीना कसेरा यांच्या तक्रारीवरुन पती संदीप कसेरा, सासू कृष्णा आणि सासरे प्रल्हाद कसेरा याच्या विरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. टीनाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हुंड्यासाठी कार आणि बाईक मागीत होता. याशिवाय महिलेला तीनही मुली असल्या कारणाने बोलणी ऐकावी लागत होती. वारंवार केल्या जाणाऱ्या त्रासामुळे शेवटी महिलेले पती विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली.

  Published by:Meenal Gangurde

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *