Home » ताज्या बातम्या » गुरुपौर्णिमेला भय्यू महाराजांच्या आश्रमावर आमदारांचीही हजेरी,मात्र मुलगीच गैरहजर

गुरुपौर्णिमेला भय्यू महाराजांच्या आश्रमावर आमदारांचीही हजेरी,मात्र मुलगीच गैरहजर

गुरुपौर्णिमेला-भय्यू-महाराजांच्या-आश्रमावर-आमदारांचीही-हजेरी,मात्र-मुलगीच-गैरहजर

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने इंदूरमधील भय्यू महाराजांच्या आश्रमावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राजकीय क्षेत्रातील मोठ मोठे नेतेमंडळी हजर होते.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 24, 2021 06:39 PM IST

इंदूर, 24 जुलै : भय्यू महाराज ( Bhayyu Maharaj) यांच्या आत्महत्येला तीन वर्षे उलटून गेली आहेत. या तीन वर्षांमध्ये भय्यू महाराज याची दुसरी पत्नी आयुषी आणि मुलगी कुहू यांच्यामधील अंतर वाढत असल्याचं दिसत आहे. शुक्रवार भय्यू महाराज यांची दुसरी पत्नी आयुषी यांनी सुखलिया स्थित सद्गुरु धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्ट य़ेथे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात औरंगाबादहून शिवसेना आमदार अंबादास दानवेदेखील सामील झाले होते. मात्र या कार्यक्रमात भय्यू महाराजांची मुलगी कुहू आली नव्हती. तिने महाराष्ट्रातील खामगाव येथे वेगळं आयोजन केलं होतं. (MLAs from Maharashtra also attended Bhayyu Maharajs ashram in Indore but only his daughter was absent)

भय्यू महाराजांच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीवरून दोघांमध्ये वाद सुरू आहे. कुहूने तर आपल्या वकिलामार्फत वृत्तपत्रांमध्ये अशी जाहिरातच दिली होती. या जाहिरातील वडिलांच्या मालमत्तेवर तिचा हक्क असल्याचं लिहिण्यात आलं होतं. आयुषी आणि कुहू गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. दोन महिन्यांपूर्वी महाराजांची आई कुमुदिनी यांचं निधन झालं तेव्हा हा वाद सर्वांसमोर आला. महाराष्ट्रातून आलेली कुहू मुक्तिधाममध्ये आजीला मुखाग्नी देण्यासाठी पुढे गेली तेव्हा आयुषीने तिला थांबवलं. आयुषीने स्वत:च मुखाग्नी दिला. त्यावेळी कुहू म्हणाली होती की, आजीनेच तिला लहानाचं मोठं केलं. मात्र तिला आजीवर अंत्यसंस्कारही करू दिलं नाही.

हे ही वाचा-जीव वाचवण्यासाठी धावली ऑक्सिजन एक्स्प्रेस, PM मोदींची बांगलादेशला मोठी मदत

भय्यू महाराजांची संपत्ती कोटींमध्ये

भय्यू महाराज यांचे सिल्वर स्प्रिंगमध्ये दोन बंगले आहेत. एकात कुहू येऊन राहते. हे दोन्ही बंगले भाड्याने दिले आहेत. आता मात्र कुहू जेव्हा इंदूरला येते तेव्हा हॉटेलमध्ये राहते. ट्रस्टच्या जवळच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भय्यू महाराजांची इंदूरमध्ये कोट्यवधींमध्ये संपत्ती आहे.

सुखलिया येथे सुर्योदय आश्रम, विजय नगर परिसरातील ट्रस्टचे कार्यालय, सुपर कॉरिडॉर क्षेत्रातील मौल्यवान जमीन, स्किम 74 शिवनेरी बंगला आणि चांदी वसंत पास येथे दोन मोठे बंगले, लक्झरी वाहने, दागिने इ. त्याचप्रमाणे शुजालपूरला दोन घरे आणि शेतजमीन आहे. याशिवाय महाराष्ट्रातील खामगाव, अकोला, औरंगाबाद, पुणे इत्यादी ठिकाणी विश्वस्त, आश्रम आणि बँक खाती आहेत.

कुहू एकमात्र उत्तराधिकारी: वकील

कुहू यांची वकील प्रियांका राणे पाटील (महाराष्ट्र) यांनी सांगितलं की, गेल्या वर्षी महाराजांच्या मालमत्तेचा लिलाव केला जात असल्याचं आम्हाला समजले. त्यानंतर आम्ही वर्तमानपत्रात जाहिरात दिली. मालमत्तेवर कुहूचा अधिकार आहे. तो एकच वारस आहे. कोणतीही व्यक्ती किंवा संस्था महाराष्ट्राच्या चल व अचल मालमत्तेसाठी कोणत्याही प्रकारचा करार करू शकत नाही. महाराजांच्या मृत्यूच्या वेळी कुहू तरुण होती, म्हणून वडिलांची संपत्ती कोठे आहे याची तिला माहिती नव्हती. आता बरीच माहिती जमा झाली आहे.

Published by: Meenal Gangurde

First published: July 24, 2021, 6:39 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *