Home » Uncategorized » #INDvNZ | दोन्ही संघांच्या सरावाला पावसाचा फटका

#INDvNZ | दोन्ही संघांच्या सरावाला पावसाचा फटका

#indvnz-|-दोन्ही-संघांच्या-सरावाला-पावसाचा-फटका

latest-newsTop Newsक्रीडा

By प्रभात वृत्तसेवा

मुंबई  – भारत व न्यूझीलंड हे दोन्ही संघ मंगळवारी मुंबईत दाखल झाले. या दोन संघात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी व अंतिम कसोटी येथील वानखेडे स्टेडियमवर येत्या शुक्रवारपासून सुरू होत आहे.

त्यापूर्वी दोन्ही संघांतील खेळाडू बुधवारपासून सराव करणार होते. मात्र, महाराष्ट्रासह देशभरात अवकाळी पाऊस सुरु झाल्याने सराव होऊ शकला नाही.

कानपूर येथे झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यामुळे ही मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ या सामन्यात विजय मिळवण्यासाठी सज्ज आहेत. बुधवारी मध्यरात्रीपासून संततधार पाउस सुरू झाल्यामुळे खेळाडूंचा हिरमोड झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

bothindia and new zealandpracticeRain hits

Prev Post

दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांच्या संरक्षणात धावली एसटी बस

Next Post

…खंडाळीकरांना मिळणार आता गावातच गॅस सिलिंडर

Leave a Reply

Your email address will not be published.