Home » Uncategorized » …खंडाळीकरांना मिळणार गावातच गॅस सिलिंडर

…खंडाळीकरांना मिळणार गावातच गॅस सिलिंडर

…खंडाळीकरांना-मिळणार-गावातच-गॅस-सिलिंडर

अकलूज – खंडाळी (ता. माळशिरस) येथील अमोल महावीर मेथा स्वस्त धान्य दुकानातून गावातील नागरिकांना घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे खंडाळीकरांना आता गावातच गॅस मिळणार आहे. यामुळे खंडाळीकरांची गॅससाठी होणारी फरफट थांबणार आहे, अशी माहिती गॅस वितरक अमोल मेथा यांनी दिली.

खंडाळी गावासाठी भारत गॅस विभागीय वितरण व्यवस्था येथील स्वस्त धान्य दुकानात करण्यात आली आहे. बुधवारी (दि. १) गॅस वितरण सेवेचा शुभारंभ अमोल मेथा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी युवा नेते विक्रम मेथा, प्रितम मेथा, यशराज मेथा, शंकर खंडागळे, रामदास चव्हाण, अनिल चव्हाण, चांगुणाबाई ढेरे उपस्थित होते.
गावामध्ये अनेक कुटुंबीयांकडे सिंगल, डबल गॅसजोड उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांना गॅस संपल्यानंतर अकलूज येथून गॅस येईपर्यंत वाट पाहावी लागत होती. परिणामी गॅस उपलब्ध होईपर्यंत महिलांना चुलीवर स्वयंपाक करावा लागत होता. ही सर्वसामान्य नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता गावातच गॅस वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना अर्जंट गॅस सिलींडर उपलब्ध होणार आहेत.

माळशिरस तालुक्यातील अनेक गावांमध्ये गॅस सिलींडर वितरण व्यवस्था सध्या सुरू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी गॅस वितरण व्यवस्था करण्यात आली आहे, यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा वाचणार आहे. नागरिकांची वेळी अवेळी गैरसोय होऊ नये तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी गॅस वितरण व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी लाभ घेऊन सहकार्य करावे.
अमोल मेथा, गॅस वितरक खंडाळी

Leave a Reply

Your email address will not be published.