Home » Uncategorized » ‘त्या’ फोटोवरून शशी थरुर ट्रोल तर मिमी चक्रवर्तींची प्रतिक्रिया; म्हणाल्या “मी सेल्फी…”

‘त्या’ फोटोवरून शशी थरुर ट्रोल तर मिमी चक्रवर्तींची प्रतिक्रिया; म्हणाल्या “मी सेल्फी…”

‘त्या’-फोटोवरून-शशी-थरुर-ट्रोल-तर-मिमी-चक्रवर्तींची-प्रतिक्रिया;-म्हणाल्या-“मी-सेल्फी…”

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभा खासदार शशी थरुर यांनी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाल्याच्या निमित्ताने आपल्या ट्विटर अकाऊंटला महिला खासदारांसोबतचा एक फोटो ट्विट केला होता. मात्र यावेळी त्यांनी दिलेले कॅप्शन अनेकांना रुचले नाही. टायवरून ते  ट्रोल झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान यानंतर शशी थरुर यांनी माफी मागत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यावेळी फोटोत असणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांनीदेखील यावर प्रतिक्रिया देत शशी थरुर यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनी राजेश नागर यांच्या ट्विटला उत्तर देताना “सेल्फी शशी थरुर यांनी नाही तर मी घेतला” असे सांगत त्यांचा बचाव केला.

He didn’t take the selfie sir i did. https://t.co/xelIrFyNWJ

— Mimssi (@mimichakraborty) November 29, 2021

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, पटियालाच्या खासदार प्रनीत कौर, दक्षिण चेन्नईच्या खासदार थमिझाची थंगापांडियन, जादवपूरच्या खासदार मिमी चक्रवर्ती, बशीरहाटच्या खासदार नुसरत जहाँ आणि करूरच्या खासदार एस जोथिमनी यांच्यासोबत एक फोटो पोस्ट केला होता.

Who says the Lok Sabha isn’t an attractive place to work? With six of my fellow MPs this morning: ⁦@supriya_sule⁩ ⁦@preneet_kaur⁩ ⁦@ThamizhachiTh⁩ ⁦@mimichakraborty⁩ ⁦@nusratchirps⁩ ⁦⁦@JothimaniMP⁩ pic.twitter.com/JNFRC2QIq1

— Shashi Tharoor (@ShashiTharoor) November 29, 2021

“कोण म्हणतं लोकसभा ही कामासाठी आकर्षक जागा नाही? सकाळी माझ्या सहकारी खासदारांसोबत,” असं कॅप्शन यावेळी त्यांनी दिलं होतं.

Mr. Tharoor, Loksabha is for Legislation not for taking selfies with women and calling them “Attractive”. You are settling a wrong precedent for future MPs.
….@mlkhattar

— MLA Rajesh Nagar (@rajeshnagarfbd) November 29, 2021

शशी थरुर यांच्या या कॅप्शनवरु नेटकऱ्यांसोबत काही राजकारण्यांनीही नाराजी जाहीर करत टीका केली. खासदार राजेश नागर यांनी ट्विट करत म्हटलं की, “मिस्टर थरुर…लोकसभा ही महिलांसोबत सेल्फी घेण्याची आणि त्यांना आकर्षक म्हणण्याची जागा नाही. तुम्ही भविष्यातील खासदारांसाठी चुकीचं उदाहरण ठेवत आहात”.

Leave a Reply

Your email address will not be published.