Home » Uncategorized » मुंबईत शिकलेले पराग आगरवाल ट्‌विटरचे नवे सीईओ

मुंबईत शिकलेले पराग आगरवाल ट्‌विटरचे नवे सीईओ

मुंबईत-शिकलेले-पराग-आगरवाल-ट्‌विटरचे-नवे-सीईओ

न्यूयॉर्क – ट्विटर या आघाडीच्या सोशल मीडिया कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) भारतीय वंशाचे तंत्रज्ञान अधिकारी पराग आगरवाल यांची नियुक्ती करण्यात आली. ते सीईओ या पदाचा राजीनामा देणारे ट्विटरचे सह संस्थापक जॅक डोर्सी यांची जागा घेतील.

आगरवाल यांनी आयआयटी मुंबई आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. ते दशकभरापूर्वी ट्विटरच्या सेवेत रूजू झाले. उल्लेखनीय सेवा आणि गुणवत्तेमुळे त्यांना काही वर्षांतच मुख्य तंत्रज्ञान अधिकारीपदी बढती मिळाली.

आता आगरवाल यांनी थेट सीईओ पदी झेप घेतली आहे. डोर्सी यांनी राजीनामा देताना आगरवाल यांच्या नेतृत्वावर आणि क्षमतेवर पूर्ण विश्‍वास व्यक्त केला. आगरवाल यांनी याआधी याहू, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये कार्य केले. त्यांच्या नव्या नियुक्तीमुळे

Leave a Reply

Your email address will not be published.